Home Video असुर्ले येथे महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

असुर्ले येथे महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

10 second read
0
0
16

no images were found

असुर्ले येथे महिलांसाठी लघुउद्योग मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न

पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील असुर्ले गावात उदयसिंह सरनोबत सरकार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

     यावेळी नरेंद्र मोदी विचार मंच, पश्चिम महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष तसेच स्वमन मानवाधिकार परिषदेच्या महिला अध्यक्षा मा. शर्विकाताई उर्फ पूनमताई तोडकर यांनी स्थानिक महिलांना घरगुती लघुउद्योग सुरू करण्याबाबत मार्गदर्शन केले.महिलांनी केवळ नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचे छोटे उद्योग सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे व्हावे, उद्योगासाठी कोणत्या संधी उपलब्ध आहेत आणि स्वतःच्या कौशल्याचा उपयोग करून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करता येईल, याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले.

       या प्रसंगी उदयसिंह सरनोबत सरकार यांच्या हस्ते मा. पूनमताई तोडकर यांचा नारळ आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमातून महिला सक्षमीकरण आणि स्वावलंबनाचा संदेश देण्यात आला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video
Comments are closed.

Check Also

जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला दिशादर्शक ठरेल -सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जबाबदारी आणि गुणवत्ता यांचा मिलाप असणारा महा-पल्स एआय प्रकल्प राज्यातील आरोग्य क्षेत्राला …