
no images were found
47 लाख कोटींची संपत्ती पण ……
नवी दिल्ली – मुस्लिम राष्ट्र असलेल्या मलेशियाचे नवीन राजे म्हणून इब्राहिम इस्कंदर यांची निवड झाली आहे. त्यांच्याकडे 47 लाख कोटीपेक्षा जास्त संपत्ती आहे. त्यांची संपत्ती आणि राजेशाही थाट पाहून तुम्हाला धक्का बसणार आहे. त्यांची स्वत:ची खासगी आर्मी आहे. 300 पेक्षा जास्त लग्झरी गाड्या त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे अनेक जेट विमान आहेत. परंतु इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माइल इदरीस हे भारतीय लष्करात अधिकारी आहेत. आता ते कॅप्टन झाले आहे.
65 वर्षी जोहोर येथील सुलतान इब्राहिम इस्कंदर मलेशियाच्या राजसिंहासनावर बसले आहे. अब्जाधीश म्हणजे धनकुबरे असलेले सुलतान इब्राहिम इस्कंदर यांनी बुधवारी मलेशियाचा 17वा राजा म्हणून शपथ घेतली. शपथ घेण्यासाठी ते त्यांच्या खासगी जेटमध्ये आले होते. 1957 मध्ये मलेशियाला ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु या देशातील नऊ राजघराण्यांचे प्रमुख दर पाच वर्षांनी राजा बनतात. मलेशियामध्ये 13 राज्ये आहेत असून नऊमध्ये राजघराणे आहेत. तसेच पेराक राज्याचा शासक आणि सिंहासनाचे पुढील वारसदार सुलतान नाझरीन यांची उपराजा म्हणून पुन्हा निवड करण्यात आली.
इब्राहिम यांचा मुलगा टुंकू इस्माईल भारतीय लष्करात अधिकारी आहे. त्यांचे आजोबा भारतीय लष्कारात होते. टुंकू जुलै 2003 मध्ये डेहराडून स्थित IMA मध्ये कॅडेट अधिकारी म्हणून दाखल झाले होते. त्यानंतर डिसेंबर 2004 मध्ये ते भारतीय लष्करात लेफ्टनंट म्हणून रुजू झाले. डिसेंबर 2007 मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली. त्याचे वडील आणि आजोबा यांनीही आयएमएमध्ये प्रशिक्षण घेतले.