Home मनोरंजन भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्दर्शित “गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्दर्शित “गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

1 second read
0
0
18

no images were found

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्दर्शित “गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

कोल्हापूर: भक्तांच्या हाकेला धावून येणारा बाप्पा आपण नेहमीच पाहिला आहे. पण यावेळी खुद्द बाप्पाच भक्तांना हाक घालणार असेल तर? देव आणि भक्त यांच्या नात्याला एक अनपेक्षित वळण देणाऱ्या या अनोख्या संकल्पनेची झलक बी-लाईव्ह प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘गणा धाव रे’ या आगामी मराठी चित्रपटामधून पाहायला मिळणार आहे. नुकताच या कमाल सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून केदार शिंदे दिग्दर्शित या चित्रपटातून गणेशोत्सवाचा उत्साह, श्रद्धेचे विविध रंग आणि माणुसकीचा हळवा पदर एका रंजक कथेतून उलगडणार आहे.
गणपती बाप्पा म्हणजे केवळ आराध्य दैवत नाही, तर प्रत्येक भक्ताच्या मनात वसलेला विश्वास! गणेशोत्सवाचा जल्लोष, बाप्पाच्या आगमनाची ओढ, मूर्ती घडवणाऱ्या कलाकाराच्या आयुष्याशी जोडलेल्या भावना आणि गणरायाशी जोडलेल्या श्रद्धेच्या विविध छटा ट्रेलरमधून अनुभवायला मिळतात.
ट्रेलरमध्ये दिसणारी निसर्गरम्य दृश्यं, गणेशोत्सवाच्या उत्साहाने भारलेलं वातावरण आणि कथेला साजेसं श्रवणीय संगीत चित्रपटाच्या भावविश्वाला अधिक समृद्ध करतं.
केदार शिंदे यांच्या दिग्दर्शनातून साकारलेल्या या चित्रपटात भरत जाधव, प्रणाली घोगरे, भार्गवी चिरमुले, कल्पना सारंग, सुलभा आर्या, आशुतोष गायकवाड, पुष्कराज चिरपुटकर, राघव गाडगे आणि ओंकार पाटील हे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सूरज सिंह, सना कुकरेजा आणि नूतन जैन यांच्या सोबतच चैतन्य राणे आणि रिचर्ड पीटर्स ह्यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून, अवनी सक्सेना आणि फरहीन खान यांनी सहनिर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे. तर चैतन्य राणे यांच्या कथेला कुणाल भगत आणि रविराज विजय कोलथरकर यांच्या संगीताची जोड लाभली असून, कुणाल भगत आणि वलय मालगुंड यांनी गीतलेखनातून या चित्रपटातील गाण्यांना सुरेल साज चढवला आहे.
येत्या २७ नोव्हेंबरला ‘गणा धाव रे’च्या निमित्ताने बाप्पाची एक अनोखी गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. श्रद्धेचे विविध पैलू आणि देव-भक्तांच्या नात्याला नवा दृष्टिकोन देणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातीलमहाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातीलमहाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्र्यांच्या हस्त…