no images were found
थोडी जादू, भरपूर धमाल आणि निखळ हास्य! सोनी सबने आपली नवीन कौटुंबिक मनोरंजन मालिका ‘लो चुडैल चली ससुराल’ सादर केली.
~ मुख्य भूमिकांमध्ये हिबा नवाब, अधिक मेहता आणि राखी विजन झळकणारा हा शो 18 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता प्रीमियर होणार आहे.~
भारतातील आघाडीच्या हिंदी जनरल एंटरटेनमेंट चॅनेल्सपैकी एक असलेला सोनी सब आपल्या आगामी कौटुंबिक मनोरंजन मालिकेद्वारे लो चुडैल चली ससुराल प्रेक्षकांना एका धमाल प्रवासावर घेऊन जाण्यास सज्ज आहे. या मालिकेचा प्रीमियर 18 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता होणार आहे. ही मालिका जादू आणि विनोद यांचा ताजेतवाना मिलाफ सादर करत दैनंदिन आयुष्याला एक अनपेक्षित वळण देण्याचे आश्वासन देते. ऑप्टिमिस्टिक्स एंटरटेनमेंट इंडिया लिमिटेड निर्मित या मालिकेत हिबा नवाब, अधिक मेहता आणि राखी विजन प्रमुख भूमिकांमध्ये झळकणार आहेत.
हिबा नवाब उर्वशीची भूमिका साकारत आहे, जी एक गोड, दयाळू मनाची चुडैल आहे आणि जी अधिक मेहता साकारत असलेल्या आरव पटेलच्या प्रेमात आकंठ बुडते. स्वतःच्या मेहनतीने उभा राहिलेला व्यावसायिक आणि प्रेमावर मनापासून विश्वास ठेवणारा आरव साधं आयुष्य जगण्यावर विश्वास ठेवतो आणि प्रामाणिकपणा, विश्वास तसेच अर्थपूर्ण नात्यांना जपतो. प्रेमासाठी उर्वशी तिचं जादुई जग मागे सोडून त्याच्यासोबत आयुष्य जगण्याचा निर्णय घेते, पण लवकरच तिला जाणवतं की एका मानवी कुटुंबात रुळणं काही सोपं नाही! आरवला आपल्या पत्नीची जादुई ओळख कळल्यानंतर त्याला आयुष्यातला सर्वात मोठा धक्का बसतो, तर उर्वशी रोजच्या आयुष्यातील प्रसंग हाताळण्यासाठी जादूचा वापर करण्याचा प्रयत्न करते आणि त्यामुळे त्यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक मजेशीर व अनपेक्षित घडामोडी घडतात. या धमाल कथेला आणखी रंगत आणते राखी विजन साकारत असलेली कमिनीची भूमिका. कमिनी ही उर्वशीची आई असून त्यांच्या गूढ जादुई विश्वातील सर्वात शक्तिशाली चुडैल्यांपैकी एक आहे. तिच्या उपस्थितीमुळे कथेत जादू आणि खोडकरपणाची आणखी भर पडते.
अजय भालवणकर, चीफ कंटेंट ऑफिसर – सोनी सब, मूव्हीज, एफटीए आणि इन्फोटेनमेंट म्हणाले,“सोनी सबमध्ये आम्ही अशा कथा सादर करण्यावर विश्वास ठेवतो ज्या आनंद, सकारात्मकता आणि हास्य पसरवतात, तसेच कुटुंबांना एकत्र येण्याची संधी देतात. चुडैल चली ससुरालद्वारे आम्ही फॅन्टसी आणि विनोद यांचा एक ताजातवाना संगम प्रेक्षकांसमोर आणत आहोत, जो अनपेक्षित घटनांनी भरलेलं एक वेगळं विश्व निर्माण करतो. या मालिकेत आगळेवेगळे पात्र आणि मनोरंजक प्रसंग आहेत, जे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचं आश्वासन देतात. हा अनोखा मनोरंजनाचा अनुभव आमच्या प्रेक्षकांच्या आयुष्यात थोडं अधिक हास्य, आनंद आणि जादू घेऊन येईल आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंददायी पाहण्याचा अनुभव ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.”
हिबा नवाब – उर्वशीची भूमिका साकारताना म्हणाली,“चुडैल चली ससुरालची गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली तेव्हा मला लगेच वाटलं की हा एक भन्नाट आणि मजेशीर प्रवास असणार आहे! आपण नेहमीच रोजच्या कौटुंबिक नाट्यमालिका पाहत आलो आहोत, पण इथे असे एक विश्व आहे जिथे अगदी वेड्यावाकड्या आणि अनपेक्षित गोष्टी घडू शकतात आणि नेमकं तेच याला इतकं मनोरंजक बनवतं. सेटवर असे अनेक क्षण येतात, जेव्हा माझं पात्र ज्या विचित्र आणि मजेशीर परिस्थितींमध्ये अडकतं, ते पाहून मला स्वतःलाच हसू येतं. ही भूमिका साकारताना मला खूप आनंद मिळतोय, कारण ती मला अधिक खेळकर होण्याची आणि कलाकार म्हणून नवनवे प्रयोग करण्याची संधी देते. माझ्या मते, या शोची खास गोष्ट म्हणजे तो संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून मनमुराद हसण्याचा साधा आणि सुंदर आनंद पुन्हा अनुभवायला लावतो.”
18 नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या लो चुडैल चली ससुरालमधील धमाल आणि गोंधळाचा आनंद घ्या, दर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी सबवर.