no images were found
इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (IBVL) तर्फे ठाणे आणि पुणे येथे २,००० हून अधिक पदांसाठी मेगा भरती मोहीम जाहीर
महिलांनी स्थापन केलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील कंपनीकडून फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना BFSI, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि कृषी क्षेत्रात रोजगाराची संधी.
ठाणे , : ठाणे मुख्यालय असलेल्या इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लिमिटेड (IBVL) या महिलांनी स्थापन केलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील कंपनीने ठाणे आणि पुणे येथील कार्यालयांमध्ये २,००० हून अधिक पदांसाठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे.
या भरतीमध्ये ग्राहक सेवा, व्हॉइस, नॉन-व्हॉइस, ई-मेल, चॅट आणि बॅक ऑफिस ऑपरेशन्स अशा विविध विभागांमध्ये BFSI, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि कृषी क्षेत्रांसाठी संधी उपलब्ध आहेत. बारावी उत्तीर्ण, पदवीपूर्व तसेच पदवीधर उमेदवारांसह फ्रेशर्स आणि अनुभवी व्यक्तींनाही अर्ज करता येणार आहे.
एक्झिक्युटिव्ह, टीम लीडरपासून ते विविध व्यवस्थापकीय पदांपर्यंत संधी उपलब्ध असून पूर्णवेळ आणि अर्धवेळ अशा दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ८८२८८ ०३३३४ / ७५०७६ ६५७५७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
या भरती मोहिमेबाबत बोलताना IBVL च्या संस्थापक आणि अध्यक्षा मंजुषा पैठणकर म्हणाल्या, “प्रत्येक नोकरी ही उज्ज्वल भविष्य घडवण्याची एक संधी असते, असा आमचा विश्वास आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे आणि अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
IBVL चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. सचिन पैठणकर म्हणाले, “रोजगारनिर्मिती आणि स्थानिक प्रतिभेला योग्य संधी देण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. संरचित प्रशिक्षण आणि व्यावसायिक विकासाच्या माध्यमातून उमेदवारांना उज्ज्वल करिअर घडवण्याची संधी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.”
डिसेंबर २०११ मध्ये अवघ्या १० कर्मचाऱ्यांसह सुरू झालेल्या IBVL कंपनीने आज १,२०० हून अधिक व्यावसायिकांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे, कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. कंपनीची देशभरात डिलिव्हरी सेंटर्स असून तिचे विस्तृत नेटवर्क ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे.
इच्छुक उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील पत्त्यांवर किंवा संपर्क क्रमांकांवर संपर्क साधावा.
ठाणे कार्यालय: वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) – ४००६०४ पुणे कार्यालय: न्याती एन्थ्रल, खराडी, पुणे – ४११०१४संपर्क: ८८२८८ ०३३३४ / ७५०७६ ६५७५७
ई-मेल: thane.hrd1@theimperative.in | pune.hrd1@theimperative.in
संकेतस्थळ: www.theimperative.in
IBVL ही समान संधी देणारी कंपनी असून भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांकडून नोंदणी, प्रक्रिया किंवा भरती शुल्क आकारले जात नाही.