Home Uncategorized ६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ

६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ

10 second read
0
0
18

no images were found

६५ व्या राज्य हौशी नाट्य स्पर्धेस सोमवारपासून प्रारंभ

कोल्हापूर : ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा,२०२६-२७ च्या प्राथमिक फेरीस सोमवार दि.१६ नोव्हेंबरपासून संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात प्रारंभ होत आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे सांयकाळी ७ वाजता उद्घाटन होणार असून या स्पर्धेत एकूण २१ दर्जेदार व आशय संपन्न नाटकांचे सादरीकरण रसिक प्रेक्षकांसाठी करण्यात येणार आहे. ही स्पर्धा संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात येत्या ९ डिसेंबरपर्यंत नाट्य प्रेमींसाठी नाममात्र दरात खुली राहणार असून राज्यातील विविध २४ जिल्हास्तरीय शहरातील केंद्रांवर या स्पर्धेचा १६ नोव्हेंबर रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे.

    सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत मराठी रंगभूमी समृध्द करण्याकरीता विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेची गौरवसंपन्न ६५ वर्षे अविरत वाटचाल चालू आहे.या वाटचालीतून देशाला,राज्याला अनेक नामवंत नाटककार, अभिनेते,तंत्रज्ञ व दिग्दर्शक मिळाले.

         त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नवनवीन अभिनव प्रयोग करुन मराठी रंगभूमीस समृध्दतेचा तसेच वैश्विकस्तराचा दर्जा प्राप्त करुन दिला. या राज्य नाट्य हौशी स्पर्धेतील अनेक होतकरु दिग्दर्शकांना तसेच कलावंताना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यातील नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्दर्शित “गणा धाव रे’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित !

भक्तीच्या नावावर रंगणार राजकारण, पण बाप्पाच्या एका हाकेने बदलणार समीकरण! केदार शिंदे दिग्द…