Home शासकीय स्वमग्नता मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

स्वमग्नता मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

13 second read
0
0
45

no images were found

स्वमग्नता मुलांवरील उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करणार – सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत

नागपूरदि. 21 : स्वमग्नता (ऑटिझम)गतिमंदता या मेंदूविकारांनी त्रस्त मुलांवरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू करण्यात येईलअसे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत सांगितले. याबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर मंत्री डॉ.  सावंत यांनी निवेदन केले. त्यांनी सांगितले कीआरोग्य विभागामार्फत शून्य ते 18 वर्षे वयोगटातील मुलांची तपासणी करून मुलांमध्ये आढळणारे जन्मतः असलेले व्यंगविकास विलंबजीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारे आजार यांचे वेळेत निदान होऊन योग्य ते उपचार करण्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक तालुक्यात पथके नियुक्त करण्यात आली आहेत. 

या पथकांमार्फत स्वमग्नता (ऑटिझम)गतिमंदता या मेंदूविकारांबाबत विद्यार्थी व अंगणवाडीतील शून्य ते सहा वर्षे वयाच्या बालकांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयात ‘डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर’ स्थापन करण्यात येत आहेत. यामध्ये अंगणवाडीशाळा स्तरावरून संदर्भित बालकांच्या बौद्धिकमानसिक आणि शारीरिक स्थितीचा विकास आणि गुणात्मक उपचारांसाठी सदरचे केंद्र कार्य करेल. या केंद्रामध्ये विविध तज्ञांच्या माध्यमातून फिजिओथेरपीओक्युपेशनल थेरपीऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपीमानसोपचारविशेष शिक्षणदंत वैद्यकीय यांसारखे उपचार देऊन या बालकांच्या बौद्धिकमानसिक आणि शारीरिक स्थितीचा विकास साधण्यात येईल. तसेच या आजारांचा महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेशाचा विचार करण्यात येईलअसेही मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवारसदस्य राजेश टोपे आदींनी सहभाग घेतला.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…