Home Uncategorized अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ

32 second read
0
0
27

no images were found

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ

संपादकीय सारांश

·         अदाणी सिमेंट मार्च २०२७ पर्यंत पहिल्या टप्प्यात सिमेंट आणि क्लिंकर वाहतुकीसाठी ४१० इलेक्ट्रिक ट्रक्स सुरू करणार आहे.

·         गुजरातमधील सांघी प्लांटमधून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.

·         ४१० इलेक्ट्रिक ट्रक्समुळे दरवर्षी २५ हजार टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे.

·         २०३० पर्यंत रस्त्याने होणाऱ्या एकूण मालवाहतुकीपैकी १० टक्के वाहतूक इलेक्ट्रिक ट्रक्सद्वारे करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. यासाठी २,००० हून अधिक इलेक्ट्रिक वाहने सुरू केली जाणार आहेत.

·         अक्षय ऊर्जेवर चालणारे इलेक्ट्रिक ट्रक्स मालवाहतुकीतून होणारे कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्यास मदत करतील. यामुळे स्कोप ३ प्रकारातील उत्सर्जन कमी करण्यास आणि कंपनीचे नेट-झिरो उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होईल.

अहमदाबाद, : अदाणी समूहाचा भाग असलेल्या आणि भारतातील आघाडीच्या बांधकाम साहित्य पुरवठादारांपैकी एक असलेल्या अदाणी सिमेंटने गुजरातमधील आपल्या सांघी प्लांटमध्ये हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ केला. अदाणी सिमेंटकडून प्रथमच इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर सुरू करण्यात आला आहे. कंपनीच्या पर्यावरणपूरक उपक्रमांच्या आणि हरित वाहतूक व्यवस्थेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

अदाणी समूहाच्या सिमेंट व्यवसायाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बहेती म्हणाले, “ सांघी प्लांटमधून सुरू झालेला हा उपक्रम म्हणजे केवळ सुरुवात आहे. क्लिंकर आणि सिमेंटच्या वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक ट्रक वापरण्याच्या दृष्टीने आम्ही देशभरातील अनेक मार्ग निश्चित केले आहेत. प्रत्येक इलेक्ट्रिक ट्रकमुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि डिझेलच्या किमतीतील चढ-उतारांचा वाहतूक खर्चावर होणारा परिणामही कमी होईल. हा पर्यावरणपूरक विकासाचा एक चांगला मार्ग आहे. याचा फायदा लोकांना, पर्यावरणाला आणि कंपनीच्या आर्थिक स्थितीलाही होईल. भारताच्या विकासाला हातभार लावताना पर्यावरणाचे संरक्षण करणारी अधिक सक्षम आणि स्पर्धात्मक सिमेंट कंपनी उभारण्याची आमची बांधिलकी या उपक्रमातून प्रत्यक्षात येत आहे.”

भारतातील सिमेंट उद्योगात हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर आर्थिकदृष्ट्याही फायदेशीर ठरत आहे. गेल्या दहा वर्षांत डिझेलच्या किमतीत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याच काळात लिथियम-आयन (Li-ion) बॅटरीच्या किमतीत सुमारे ७० टक्क्यांनी घट झाली असून, सौर ऊर्जेचे दरही ४७ टक्क्यांनी कमी झाले आहेत.

डिझेलवर चालणाऱ्या ट्रकमधून प्रत्येक किलोमीटरमागे सुमारे ०.७३७५ किलो कार्बन डायऑक्साइड (CO₂) उत्सर्जित होतो. मात्र, अक्षय ऊर्जेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक ट्रकमुळे मालवाहतुकीतून होणारे हे उत्सर्जन १०० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकते. त्यामुळे वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक ट्रकचा वापर करणे हा स्कोप ३ प्रकारातील कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे. अदाणी सिमेंटच्या ४१० इलेक्ट्रिक ट्रक्समुळे दरवर्षी २५ हजार टनांपेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन कमी होण्याचा अंदाज आहे. या ट्रक्समुळे दरवर्षी सुमारे १.१ कोटी लिटर डिझेलची बचत होणार आहे. याशिवाय, भविष्यात इतर मार्गांवर आणि प्लांटमध्येही इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर वाढवण्याची कंपनीची योजना आहे.

भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सिमेंट उत्पादक देश आहे. देशभरात चुनखडी, क्लिंकर आणि तयार सिमेंटची वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. ही वाहतूक सिमेंट उद्योगासाठी अत्यंत आवश्यक असली, तरी त्यातून मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होते. अदाणी सिमेंटने इलेक्ट्रिक ट्रक्सचा वापर सुरू करून वाहतुकीचा खर्च कमी करण्यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दिशेनेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

 
Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक – 1 सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रिया

सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक – 1 सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्…