Home Uncategorized सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक – 1 सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रिया

सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक – 1 सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रिया

30 second read
0
0
24

no images were found

सीपीआर हॉस्पिटलचा हृदयरोग विभाग महाराष्ट्रात क्रमांक – 1 सर्वाधिक 11 TAVI यशस्वी शस्त्रक्रिया : जनसामान्य रुग्णांचा आधार सीपीआर -हृदयरोग विभागाची कामगिरी दमदार

कोल्हापूर: :  शासकीय आरोग्य सेवेत ऐतिहासिक कामगिरी करताना छत्रपती प्रमिला राजे (सीपीआर) शासकीय रुग्णालयातील, हृदयरोग विभागाने आज अखेर तब्बल 11 TAVI (Trans Catheter Aortic Valve Implantation) शस्त्रक्रिया (प्रक्रिया) अतिशय यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (GMC) ही संख्या सर्वाधिक आहे.

या विक्रमामुळे सीपीआर – कोल्हापूर आता TAVI साठी राज्यात नंबर 1 झाले आहे. ही प्रक्रिया म्हणजे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेचा मानबिंदू म्हटल्यास वावगे ठरू नये. अत्याधुनिक आणि जीव वाचवणाऱ्या या हृदय शस्त्रक्रिया यापूर्वी फक्त मोठ्या खाजगी रुग्णालयातच होत होत्या.

नुकतीच जयसिंगपूर येथील 86 वर्षीय पुरुष व कोल्हापूर येथील 77 वर्षीय महिला रुग्णांवर एकाच दिवशी ही यशस्वी TAVI प्रक्रिया करण्यात आली. दोघेही गंभीर Bicuspid Aortic Valve Stenosis (अनुक्रमे Type I व Type 0) सह Horizontal Aorta आणि गंभीर कॅल्शिफिकेशनने ग्रस्त होते. त्यांना श्वास लागणे, छातीत दुखणे,चक्कर येणे, पायावर सूज येणे, तसेच उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. त्यांचे वय आणि ओपन हार्ट सर्जरीसाठी असलेला उच्च धोका लक्षात घेऊन, हृदयरोग विभाग प्रमुख डॉ. अक्षय बाफना यांच्या नेतृत्वाखालील हार्ट टीमने TAVI केली. यामध्ये छाती न उघडता मांडीतील रक्तवाहिनीतून अनुक्रमे 29 mm व 26 mm Self Expandable Dry Tissue Valve बसवून नवीन झडप बसवण्यात आली. दोन्ही रुग्ण दुसऱ्या दिवशी चालायला लागले व तिसऱ्या दिवशी डिस्चार्ज झाले.

सीपीआर कोल्हापूरचा हृदयरोग विभाग आज राज्यातील सर्वात व्यस्त आणि अत्याधुनिक विभागांपैकी एक आहे, जो दर महिन्याला सुमारे 150-200 उच्च दर्जाच्या Interventional Cardio-Neuro-Vascular प्रक्रिया करतो. गुंतागुंतीच्या अँजिओप्लास्टी, TAVI, पेसमेकर, डिव्हाईस क्लोजरपासून ते न्यूरो आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर इंटरव्हेंशनपर्यंत सर्वात गंभीर रुग्णांवर या ठिकाणी जागतिक दर्जाचे उपचार येथे केले जातात. याठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील DM Cardiology या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाचे हे एकमेव अध्यापन संस्थान (Teaching Institute) आहे.

या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ,अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने तसेच उपअधिक्षक डॉ.गिरीष कांबळे यांनी हृदयरोग विभागाच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.

ही यशस्वी शस्त्रक्रिया डॉ. अक्षय बाफना (विभाग प्रमुख, हृदयरोग), डॉ.स्फूर्ती जाधव,डॉ.अजित हांगे, डॉ. आदिब शेख,डॉ. निखिल गदाडे, डॉ. सोमेश चौगुले, डॉ. सम्यक भिवगडे (DM Cardio Residents), डॉ.श्री गणेश कामत आणि डॉ. हेमालता देसाई (Cardiac Surgery Anaesthesia), डॉ. मजीद मुल्ला आणि डॉ. किशोर देवरे (Cardiac Surgeons) तसेच ABPMJAY योजनेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सईदेवी सरदेसाई , डॉ. मनाली माने यांच्या टीमने पार पाडली. या कामी टेक्निशियन देवेंद्र शिंदे, उदय बिरंजे आणि वैष्णवी सावंत, आणि नर्सिंग विभाग प्रमुख मधुरा जावडेकर अमृता कराडे, पल्लवी खाडे, रवींद्र भंडारी, संदेश ताम्हाणे, शुभांगी जाधव, स्वाती शेळके, रेखा पाटील, सुरेखा गावडे आणि दीपा माळी यांच्यासह प्रशासकीय अधिकारी श्री. जगताप, श्री. जयदीप व टीम रेलिसिस यांचेही सहकार्य लाभले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ

अदाणी सिमेंटकडून क्लिंकर आणि सिमेंट वाहतुकीसाठी हेवी-ड्युटी इलेक्ट्रिक ट्रक्सचा शुभारंभ सं…