Home Uncategorized २९ ऑक्टोबरला श्रृंगेरी शारदा महापीठम्चे जगद्गुरु श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते ‘श्री अनघादत्तधाम’ या उपक्रमाचा शिलान्यास !

२९ ऑक्टोबरला श्रृंगेरी शारदा महापीठम्चे जगद्गुरु श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते ‘श्री अनघादत्तधाम’ या उपक्रमाचा शिलान्यास !

5 second read
0
0
7

no images were found

२९ ऑक्टोबरला श्रृंगेरी शारदा महापीठम्चे जगद्गुरु श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते ‘श्री अनघादत्तधाम’ या उपक्रमाचा शिलान्यास !

कोल्हापूर – जीवबानाना जाधव पार्क येथील ‘श्री अनघादत्तधाम’ या उपक्रमाचा शिलान्यास श्रृंगेरी शारदा महापीठमचे जगद्गुरु श्री श्री विधूशेखर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते २९ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता करण्यात येणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी भाविक, भक्त, नागरिक यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित रहावे, असे आवाहन श्री अनघादत्तधामचे संस्थापक अध्यक्ष वेदमूर्ती सुहास जोशीगुरुजी यांनी केले आहे.
        श्री अनघादत्तधामची संकल्पना !
श्रीविद्या शक्तिपात महायोगाश्रम कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून श्रीविद्या उपासना, शक्तिपात महायोग साधना आणि गुरुपरंपरेतील आध्यात्मिक विचार यांचा प्रसार केला जातो. या उपासना-साधनेसाठी आणि भाविकांना पवित्र स्थान उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘श्री अनघादत्तधाम’ उभारण्याचा संकल्प करण्यात आला. वर्ष २०२० मध्ये करवीरपीठाचे जगद्गुरु शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामी महाराज यांच्या पवित्र हस्ते श्रीअनघादत्तधाम प्रकल्पाचा शुभारंभ झाला.
      प्रकल्पाचे स्वरूप
श्रीमहालक्ष्मीदेवी मंदिरापासून ४ किलोमीटर अंतरावर जीवबा नाना जाधव पार्क परिसरात ४ गुंठे जागेवर हे धाम साकारत आहे. या ठिकाणी भगवान श्री अनघादत्त, श्रीमहात्रिपुरसुंदरी माता, श्रीचक्र आणि श्रीवल्लभमहागणपती यांच्या मूर्ती याचसमवेत ध्यानकक्ष, साधक निवास, वेदपाठशाळा, गोशाळा, यज्ञशाळा, दुर्मिळ ग्रंथालय आणि श्रीगुरुस्मृतिसंग्रहालय अशा विविध उपक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी तन, मन, धन यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन वेदमूर्ती सुहास जोशी यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

विशेष लेख महात्मा फुले : कृतीशीलतेचे अग्रदूत       

विशेष लेख महात्मा फुले : कृतीशीलतेचे अग्रदूत            &nbs…