
no images were found
अनाथ बालकांसाठीअनाथ पंधरवड्याचे आयोजन
कोल्हापूर : जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, एस.पी ऑफीसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यातील अनाथ बालकांनी दि. 23 फेब्रुवारी ते 5 मार्च या कालावधीमध्ये आधारकार्ड, रेशनकार्ड, जातीचा दाखला, अधिवास व राष्ट्रीयत्वाचा दाखला व मतदानकार्ड काढण्यासाठी समर्पित कक्षातील अभिमन्यू पुजारी (9604823008) व श्रीम. सुलभा माने (9356768842) यांच्याशी संपर्क साधावा. तरी नागरिकांनी अनाथ बालकांना व त्यांच्या नातेवाईकांना या अनाथ पंधरवड्याची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस. एस. वाईंगडे यांनी केले आहे.