Home Uncategorized विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकी प्रकरणी हाऊस ऑफ सेलिब्रेशन सील

विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकी प्रकरणी हाऊस ऑफ सेलिब्रेशन सील

14 second read
0
0
9

no images were found

विनापरवाना व्यवसायासह घरफाळा थकबाकी प्रकरणी हाऊस ऑफ सेलिब्रेशन सील

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेचा अधिकृत व्यवसाय परवाना न घेता तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्जही दाखल न करता सुरू ठेवण्यात आलेल्या लक्ष्मी रोड वरील सागर गुजर यांचे कपडे शोरुम हाऊस ऑफ सेलिब्रेशन या विनापरवाना व्यवसायावर महापालिकेच्या परवाना, घरफाळा, अग्निशमन व विभागीय कार्यालय क्र.2 छत्रपती शिवाजी मार्केट यांच्यावतीने कारवाई करून व्यवसाय सील केले. संबंधित व्यवसायधारकाकडे घरफाळ्याची थकबाकीही असल्याने ही कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.

            लक्ष्मी रोड वरील सागर गुजर यांचे कपडे शोरुम हाऊस ऑफ सेलिब्रेशन हा व्यवसाय विनापरवाना सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यापूर्वी महापालिकेच्या परवाना विभाग तसेच अग्निशमन विभागामार्फत नियमानुसार नोटीस देण्यात आली होती. मात्र, महापालिका प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून संबंधितांनी व्यवसाय परवाना घेतला नाही तसेच परवाना मिळविण्यासाठी आवश्यक अर्जही दाखल केला नाही. यासोबतच घरफाळ्याची थकबाकी असल्याने संबंधित व्यवसाय ही सील करण्यात आला.

            ही कारवाई उपायुक्त किरणकुमार धनवाडे व सहायक आयुक्त स्वाती दुधाणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईमध्ये परवाना अधिक्षक अशोक यादव, मुख्य अग्निशमन अधिकारी मनिष रणभिसे, परवाना निरीक्षक संदिप भोई, शिवाजी कोकरे, वरिष्ठ कर सहायक सचिन इंगवले, विनोद रुईकर, स्थानक अधिकारी कांता बांदेकर, भोलानाथ पाटणकर, घरफाळा, अग्निशमन, परवाना व विभागीय कार्यालय क्र. २ मधील कर्मचारी उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवसायधारकांनी नियमानुसार व्यवसाय परवाना घेऊनच व्यवसाय करावा तसेच घरफाळा व इतर महापालिका करांची थकबाकी वेळेत भरावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई कोल्हापूर, : कोल्हापू…