Home सामाजिक आचारसंहितेमुळे महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित

आचारसंहितेमुळे महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित

8 second read
0
0
10

no images were found

आचारसंहितेमुळे महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार स्थगित

कोल्हापूर, : कोल्हापूर महानगरपालिकेशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी (शासकीय सुट्टी असल्यास दुसऱ्या दिवशी) लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. तसेच शहरातील नागरिकांच्या समस्या व अडचणी थेट जाणून घेऊन त्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी दर महिन्याच्या ५ तारखेला महापौर सौ. रुपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येतो.

            मात्र, महाराष्ट्र विधान परिषदेच्या 03 पदवीधर व 02 शिक्षक मतदारसंघाची द्वैवार्षिक निवडणूक -2026 अनुषंगाने शहरात मंगळवार, दि.22 सप्टेंबर 2026 पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेच्या कालावधीत महापालिकेचा लोकशाही दिन व जनता दरबार आयोजित करण्यात येणार नाही. याची संबंधित नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई

कळंबा साई मंदिर परिसरातील २५ अनधिकृत हातगाड्यांवर महापालिकेची कारवाई कोल्हापूर, : कोल्हापू…