Home राजकीय गांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच…! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा – आमदार राजेश क्षीरसागर

गांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच…! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा – आमदार राजेश क्षीरसागर

3 second read
0
0
15

no images were found

गांधी मैदानाचा वापर केवळ खेळासाठीच…! महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज करा – आमदार राजेश क्षीरसागर

चार दिवसांत उपाययोजना, विकासकामांचा आराखडा सादर करण्याचे महापालिका अधिकाऱ्यांना निर्देश

कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या गांधी मैदानाचा वापर केवळ खेळ आणि क्रीडा उपक्रमांसाठीच करण्यात यावा. मैदानावरील व्यावसायिक तसेच खाजगी पार्किंग तत्काळ बंद करून मैदान खेळाडूंसाठी खुले करावे. येत्या महिनाभरात गांधी मैदानाचे सपाटीकरण, बैठक व्यवस्था आदी उपाययोजना करून मैदान खेळण्यायोग्य व सुसज्ज करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा स्पष्ट सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या.

आमदार राजेश क्षीरसागर यांनी गांधी मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून मैदानाची सद्यस्थिती, खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी आणि आवश्यक पायाभूत सुविधांचा आढावा घेतला. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांना मैदानाच्या विकासाबाबत कालबद्ध नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी सूचना देताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, गांधी मैदान हे शहरातील खेळाडूंसाठी महत्त्वाचे क्रीडांगण आहे. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ परिसरातील सुमारे १० हजार खेळाडू, अबालवृद्ध या मैदानावर कसरत करतात. मात्र, मैदानाचा वापर व्यावसायिक व खाजगी पार्किंगसाठी होत आहे. ड्रेनेज लाईनची समस्या वारंवार उद्भवत आहे. खेळाडूंना सरावासाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नाही. त्यामुळे मैदानावरील सर्व प्रकारचे व्यावसायिक व खाजगी पार्किंग तातडीने बंद करून मैदानाचा वापर केवळ क्रीडा उपक्रमांसाठीच होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश आमदार क्षीरसागर यांनी दिले.

खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळणे हा प्राधान्याचा विषय असून, गांधी मैदानाचा मूळ उद्देश जपत त्याचा उपयोग क्रीडा विकासासाठीच झाला पाहिजे. मैदानाच्या विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. मैदानाचे सपाटीकरण करून खेळण्यायोग्य पृष्ठभाग तयार करावा. मुख्य प्रवेशद्वाराजवळील ड्रेनेज लाईनच्या कामासाठी तातडीने प्रस्ताव तयार करावा. याठिकाणी खेळाडूंसाठी महिला व पुरुष असे स्वतंत्र स्वच्छतागृह उभारावे, जलतरण तलाव निर्माण करणे आदी या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत महापालिका आयुक्तांना सूचना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कामांचा समावेश असलेला सविस्तर आराखडा येत्या चार दिवसांत तयार करून सादर करावा. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय कार्यवाही करून महिनाभरात मैदान खेळाडूंसाठी सुसज्ज आणि पूर्णतः खेळण्यायोग्य करून द्यावे, अशी कालमर्यादा आमदार क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांना घालून दिली.

 महापालिका सभेत ठराव करण्याच्या नगरसेवकांना सूचना

गांधी मैदान केवळ खेळाडू आणि क्रीडा उपक्रमांसाठीच राखीव ठेवण्याबाबत महापालिकेच्या सभेत ठराव मंजूर करून घ्यावा. तसेच क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी नाममात्र भाडे आकारणी करावी, मैदानावर पुरेशी प्रकाशव्यवस्था (लाईट) उपलब्ध करून द्यावी आणि खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा पुरवाव्यात, अशा सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थित नगरसेवकांना दिल्या.

       यावेळी उपमहापौर अक्षय जरग, नगरसेवक अजय इंगवले, नगरसेवक प्रसाद चव्हाण, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, शहरप्रमुख रणजीत जाधव, कपिल सरनाईक, शैलेश साळोखे, पियुष चव्हाण, अर्जुन संकपाळ, सुहास साळोखे, महेश गुरव, दादू कोठावळे, कपिल भूयेकर, अमित महाडिक, राजू समर्थ, मिलिंद पवार, सतीश माजगावकर, अनिरुद्ध भुरके, शहरअभियंता रमेश मस्कर, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, उपशहरअभियंता मिलिंद जाधव आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष मदत पॅकेज द्या, गाळप उसाला प्रतिटन ५०० ते ७०० रुपयांचे केंद्र सरकारने अर्थसहाय्य द्यावे, खासदार धनंजय महाडिक यांची केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्याकडं मागणी

दुष्काळाचे सावट असलेल्या सोलापूरसह महाराष्ट्रातील शेतकरी, साखर कारखाने व पशुधनासाठी विशेष …