Home राजकीय महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राची मोठी झेप! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये १ हजार ६६ जागांची वाढ ; देशात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राची मोठी झेप! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये १ हजार ६६ जागांची वाढ ; देशात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

19 second read
0
0
3

no images were found

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राची मोठी झेप! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये १ हजार ६६ जागांची वाढ ; देशात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

कोल्हापूर  :  महाराष्ट्र राज्याने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती साधत पदव्युत्तर (Postgraduate Broad-Speciality) वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत तब्बल १ हजार ६६ जागांची वाढ केली आहे. त्यामुळे येत्या २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या एकूण जागांची संख्या तब्बल ७ हजार ६१५ जागावर पोहोचली आहे. वैद्यकीय क्षेत्रात देशात कर्नाटकनंतर महाराष्ट्राने द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या महत्त्वपूर्ण यशाबद्दल राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाधान व्यक्त करून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत नियोजनबद्ध पद्धतीने केलेले प्रयत्न तसेच वैद्यकीय महाविद्यालयांमधील पायाभूत सुविधांचा विकास व पदव्युत्तर शिक्षणाच्या संधी वाढविण्यासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपाय योजनांमुळे ही उल्लेखनीय वाढ साध्य झाल्याचे श्री मुश्रीफ यांनी नमूद केले.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (NMC) ६ नोव्हेंबर रोजी अद्ययावत केलेल्या जागांच्या आकडेवारीनुसार, मागील शैक्षणिक वर्षातील जागांच्या तुलनेत यंदा १६.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील राज्यनिहाय आकडेवारीत कर्नाटक ८,८६२ जागांसह प्रथम क्रमांकावर असून, महाराष्ट्र ७,६१५ जागांसह द्वितीय क्रमांकावर आहे.
राज्यातील २३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम.डी. व एम.एस. या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या एकूण ७२० अतिरिक्त जागांची भर पडली आहे.यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे सर्वाधिक ७७ जागांची वाढ नोंदविण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर – ७३, सातारा -६४, धुळे – ४४, तर अंबरनाथ येथे ४० जागांची वाढ झाली आहे.
चौकट – राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ३९ नवीन ( एम.डी )जागांची वाढ झाली असून कोल्हापूरच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासाठी ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे या वाढीमुळे महाविद्यालयातील विविध वैद्यकीय विभागांमध्ये पदव्युत्तर शिक्षणाच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

या जागांची विभागनिहाय वाढ पुढीलप्रमाणे -भूलशास्त्र विभाग (Anaesthesia) – १० जागा,
– प्रतिबंधात्मक व सामाजिक वैद्यकशास्त्र विभाग (PSM) -४ ; त्वचारोग व गुप्तरोग विभाग (Skin & VD) ४ ; शरीर क्रियाशास्त्र विभाग (Physiology)-४; रेडिओलॉजी विभाग (Radiology) ४ ;
– मनोविकारशास्त्र विभाग (Psychiatry) ३ ; जनरल सर्जरी विभाग (General Surgery) ५ ; प्रसूती व स्त्रीरोगशास्त्र विभाग (Obstetrics & Gynaecology) -३ ; छाती व क्षयरोग विभाग (Chest & TB) – १ ; तर नेत्ररोगशास्त्र विभाग (Ophthalmology) – १ अशा एकूण ३९ (एम.डी ) नवीन जागांची भर पडली आहे. या जागावाढीमुळे संबंधित विभागांच्या विभागप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर विद्यार्थ्यांना अधिक व्यापक शैक्षणिक, संशोधनात्मक व प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

चौकट – या वाढीव ३९ जागांमुळे भूलशास्त्र, शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, रेडिओलॉजी, मनोविकारशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या वैद्यकीय शाखांमधील विशेषज्ञ डॉक्टरांची निर्मिती होण्यास चालना मिळणार आहे. पदव्युत्तर वैद्यकीय जागांमध्ये झालेल्या या वाढीमुळे कोल्हापूरात विशेषज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढण्यास मदत होणार आहे. शासकीय रुग्णालयांमधील उपचार क्षमता अधिक सक्षम होऊन सर्वसामान्य रुग्णांना दर्जेदार व विशेषज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध होण्यास हातभार लागणार आहे – अधिष्ठाता डॉ सदानंद भिसे .

या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या ३९ नवीन जागांना मान्यता मिळविण्याच्या प्रक्रियेत संबंधित विभागप्रमुखांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. यामध्ये डॉ.उल्हास मिसाळ , डॉ. बाबासो माळी,डॉ.वसंत देशमुख, डॉ.सुदेश गंधम ,डॉ.अनिता सैबन्नावर , डॉ . भास्कर मूर्ती,डॉ.पवन खोत डॉ. आशा खाडे आणि डॉ.अभिजीत ढवळे, या विभाग प्रमुखांचे अतिशय उल्लेखनीय योगदान आहे.

या सर्व प्रक्रियेत वैद्यकीय शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य) हसन मुश्रीफ यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य झाली – डॉ. गिरीष कांबळे उपअधिक्षक (सीपीआर)

महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, तसेच विभागातील सहयोगी प्राध्यापक,सहायक प्राध्यापक तसेच प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे ही महत्त्वपूर्ण कामगिरी साध्य झाली – वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेंद्र मदने .

या वाढीव जागांमुळे राज्यात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षणाच्या संधीमध्ये वाढ होऊन भविष्यात अधिक तज्ज्ञ डॉक्टर निर्माण होण्यास मदत होणार आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी

ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी, २…