Home सामाजिक ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी

ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी

8 second read
0
0
7

no images were found

ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसमवेत खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांची दिवाळी, २५० कुटुंबांना साडी, लहान मुलांना कपडे, फराळ आणि मिठाईचे झाले वाटप

कोल्हापूर (प्रतिनिधी):-हातावरचे पोट असलेली अनेक कुटुंबं, अडीचशे ते तीनशे मैलावरुन ऊस तोडीसाठी साखर कारखाना स्थळावर येतात. त्यांना सण-उत्सवाचा आनंद घेता येत नाही. एकवेळची चूल पेटणेही अवघड असते. अशा ऊस तोडणी कामगारांसोबत खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक आणि भाजपच्या पदाधिकार्‍यांनी दिवाळीचा आनंद घेतला. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर राहणार्‍या २५० ऊसतोडणी मजुरांच्या कुटुंबांना साडी, कपडे, फराळ आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून ऊस तोड मजुरांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न झाला.
बीड, उस्मानाबाद यासारख्या दुष्काळी जिल्ह्यातून ऊस तोडणीसाठी मजुरांच्या टोळ्या साखर कारखाना स्थळांवर येतात. या मजुरांची परिस्थिती अतिशय हलाखीची असते. कारखान्याच्या परिसरातच पालाची झोपडी बांधून, हे ऊस तोडणी कामगार राहतात. ४ काठ्या बांधून उभारलेले स्नानगृह, झोपडीच्या दारात ३ दगडांची चूल आणि मुलांना झोपण्यासाठी झाडाला टांगलेला साडीचा झोपाळा अशा परिस्थितीत हे कुटुंबीय, ऊस तोड करत जगण्याची लढाई लढत असतात. या ऊस तोडणी मजुरांनाही दिवाळी साजरी करता यावी, यासाठी भारतीय जनता पार्टीने राज्यभर उपक्रम सुरू केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाची सुरवात केली. त्यानंतर आज खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्या पुढाकारातून, कसबा बावडा इथल्या छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना स्थळावर राहणार्‍या ऊस तोड मजुरांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली. खासदार धनंजय महाडिक आणि आमदार अमल महाडिक यांच्यासह भाजपच्या पदाधिकार्‍यांनी ऊस तोड मजुरांच्या कुटुंबियांसोबत फराळाचा आनंद घेतला. त्यानंतर २५० कामगारांच्या कुटुंबांना साड्या, लहान मुलांना कपडे आणि मिठाई देऊन त्यांची दिवाळी गोड केली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाजीराव चौगुले, धीरज उलपे, माजी नगरसेवक प्रदीप उलपे, अशोक जाधव यांच्यासह डॉ. सदानंद राजवर्धन, कृष्णात उलपे, शरद बेडेकर, संजय जासूद, अमित टिकले, धीरज पाटील, राजाराम परीट, संजय पाटील, अभिषेक भोसले, किशोर पोवार, उमा पोवार, मकरंद बोराडे उपस्थित होते. ऐन दिवाळीत नवे कपडे, फराळ आणि मिठाई मिळाल्यानं ऊस तोडणी कामगारांचे कुटूंबिय खुश झाले. विशेषत: लहान मुलांच्या चेहर्‍यावरील आनंद आणि समाधान मानवतेची भावना अधोरेखित करणारे ठरले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राची मोठी झेप! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये १ हजार ६६ जागांची वाढ ; देशात महाराष्ट्र द्वितीय क्रमांकावर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 

महाराष्ट्राच्या वैद्यकीय शिक्षण क्षेत्राची मोठी झेप! पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या …