Home राजकीय शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची दिवाळी

शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची दिवाळी

1 second read
0
0
8

no images were found

शेतकऱ्यांच्या बांधावर खासदार धैर्यशील माने यांची दिवाळी

कोल्हापूर : हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी शाहूवाडी तालुक्यातील दुर्गम सोनुर्ले पैकी धोंडेवाडी येथे शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. एका सामान्य शेतकऱ्याच्या घरी जमिनीवर बसून त्यांनी ग्रामस्थांसोबत झुणका-भाकरीचा आस्वाद घेतला, तसेच महिलांना दिवाळी फराळाचे वाटप केले.

यावेळी उपसरपंच बळवंत मुगडे, बाबा लाड, चंद्रकांत मुगडे, अतिश शिंगे, संभाजीराव देसाई, ओमकार चौगुले, दादासाहेब गावडे यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते. दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत खासदार माने यांनी साधेपणाने साजरी केलेली दिवाळी ग्रामस्थांसाठी आनंददायी ठरली

यावेळी ग्रामस्थांनी रस्ते, पाणीटंचाई, आरोग्य सुविधा, एसटी बस, वीजपुरवठा, सातबारा आणि वन्यप्राण्यांच्या त्रासासह विविध समस्या मांडल्या. या प्रश्नांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन पाठपुरावा करण्याची ग्वाही खासदार माने यांनी दिली. नवीन गाव तलावाचा प्रस्ताव तयार करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरो…