Home Uncategorized ‘आविष्कार’मध्ये स्कूल ऑफ नॅनोसायन्सला तीन सर्वसाधारण विजेतीपदे

‘आविष्कार’मध्ये स्कूल ऑफ नॅनोसायन्सला तीन सर्वसाधारण विजेतीपदे

0 second read
0
0
7

no images were found

‘आविष्कार’मध्ये स्कूल ऑफ नॅनोसायन्सला तीन सर्वसाधारण विजेतीपदे

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी या अधिविभागाने अविष्कार संशोधन स्पर्धेच्या विविध स्तरांवर आणि विभागांत तीन सर्वसाधारण विजेतीपदे पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

कोल्हापूर जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेत अधिविभागाने पदवी स्तरावरील जनरल चॅम्पियनशिप (सर्वसाधारण विजेतेपद) पटकावली. अधिविभागाच्या तीन विद्यार्थ्यांनी नावीन्यपूर्ण संशोधन प्रकल्पांसाठी पारितोषिके प्राप्त केली. यामध्ये विज्ञान विभागातून तन्मयी पाटील, तर औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय विभागातून अमोघ विक्रम बहादूरदेसाई आणि फरझीन शेख (तिघेही बी.एस्सी. भाग २) यांनी यश संपादन केले. या तिन्ही विद्यार्थ्यांनी विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेतही पारितोषिके प्राप्त केली.

विद्यापीठस्तरीय स्पर्धेत अधिविभागाने विज्ञान आणि औषधनिर्माणशास्त्र व वैद्यकीय या दोन विभागांमध्ये जनरल चॅम्पियनशिप पटकावली. पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तनिष्का पाटील, मृणाल गेंगे आणि प्रीती पाटील यांनीही आपल्या नावीन्यपूर्ण संशोधन कार्यासाठी पारितोषिके प्राप्त केली.

या यशात अधिविभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘नॅनोस्पार्क २०२६’ या उपक्रमाचा महत्त्वपूर्ण वाटा असून, या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना संशोधनवृत्ती, वैज्ञानिक सर्जनशीलता, नावीन्यपूर्ण संकल्पना आणि संशोधन सादरीकरण कौशल्य विकसित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले, अशी भावना विभागाचे संचालक डॉ. किरण कुमार शर्मा यांनी व्यक्त केली. ‘नॅनोस्पार्क २०२६’ आणि आविष्कार स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून डॉ. किशोरकुमार खोत आणि डॉ. प्रमोद कोयले यांनी काम पाहिले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरो…