no images were found
धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (एनएसई ) इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (ईजीआर) मध्ये विक्रमी उलाढाल
मुंबई-भारतातील पहिल्या क्रमांकाच्या आणि संघटित सुवर्ण बाजाराच्या विकासासाठी एक महत्त्वाचा टप्पा गाठत, नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाने (एनएसई) इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसिप्ट्स (ईजीआर) सेगमेंटमध्ये आतापर्यंतचा सर्वोच्च ट्रेडिंग व्हॉल्यूम नोंदवला आहे. सोन्याची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या धनत्रयोदशीच्या दिवशी एनएसई ईजीआर ची मोठ्या प्रमाणावर निर्मिती झाली, जी या नाविन्यपूर्ण साधनाबाबत वाढती जागरूकता आणि स्वीकृती दर्शवते.धनत्रयोदशीच्या निमित्ताने एनएसई ला देशभरातून ईजीआर ची नवीन सणासुदीची मागणी मिळाली, जी एनएसई ईजीआर सेगमेंटमध्ये सक्रियपणे सहभागी झालेल्या सुवर्ण पुरवठादारांद्वारे पूर्ण करण्यात आली.एनएसई ईजीआर सेगमेंटमधील ट्रेडिंग व्हॉल्यूम २,२७,६९२ युनिट्सवर पोहोचला, जो या सेगमेंटसाठी एक विक्रम आहे.
एनएसई ईजीआर गुंतवणूकदारांना सोन्याची मालकी मिळवण्यासाठी एक्सचेंज-ट्रेडेड, डिमॅटरिएलाइज्ड (डिमे ट) पर्याय उपलब्ध करून देतात. यामध्ये प्रत्यक्ष सोन्याचे मूळ मूल्य आणि सिक्युरिटीज मार्केट इकोसिस्टमची पारदर्शकता, सुरक्षितता व कार्यक्षमता यांचा संगम आहे. तसेच, देशांतर्गत उपलब्ध असलेले प्रत्यक्ष सोने, ज्यामध्ये रिसायकल केलेले सोने देखील समाविष्ट आहे, त्याला औपचारिक वित्तीय व्यवस्थेत आणण्याचा एक मार्ग एनएसई ईजीआर द्वारे मिळतो.
याव्यतिरिक्त, नियमन नसलेल्या वातावरणात चालणाऱ्या अनेक डिजिटल-गोल्ड प्लॅटफॉर्म्सच्या विपरीत, एनएसई ईजीआर सहभागींना नियमन केलेल्या आणि पारदर्शक बाजार व्यवस्थेमध्ये सोने खरेदी करणे, बाळगणे आणि व्यापार करण्याची संधी देतात. एक्सचेंज-आधारित ट्रेडिंग, मानकीकृत क्लिअरिंग व सेटलमेंट यंत्रणा आणि नियामक देखरेख यामुळे, गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास बळकट करताना एनएसई ईजीआर सुवर्ण बाजारात सहभाग घेण्यासाठी अधिक संघटित आणि सुरक्षित मार्ग देतात.
या टप्प्याबद्दल बोलताना एनएसई चे चीफ बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर श्री. श्रीराम कृष्णन म्हणाले:”धनत्रयोदशी हा संपत्ती, समृद्धी आणि सोन्याच्या शाश्वत मूल्याचा सण आहे. परंपरेनुसार, प्रत्यक्ष सोने खरेदी करणे हा या सणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. तथापि, काळानुसार आपण सोने कसे बाळगतो आणि मालकी कशी ठेवतो यामध्ये बदल होत आहे. प्रत्यक्ष धातू जवळ न ठेवताही, सोन्याचे मूळ मूल्य अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि सुरक्षित स्वरूपात टिकवून ठेवण्याची संधी एनएसई ईजीआर देतात.
प्रत्यक्ष स्वरूपात असो वा डिमॅटरिएलाइज्ड स्वरूपात, सोन्याचे मूल्य समानच राहत असल्याने एनएसई ईजीआर हे सोन्याच्या मालकीमधील एक प्रगती दर्शवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, देशांतर्गत उपलब्ध आणि रिसायकल केलेले सोने एनएसई ईजीआर मध्ये रूपांतरित करण्यास प्रोत्साहन देऊन, आपण भारताची विद्यमान सुवर्ण संसाधने एकत्र आणू शकतो, संघटित सुवर्ण व्यवस्था मजबूत करू शकतो आणि सोन्याच्या आयातीवरील आपले अवलंबित्व संभाव्यपणे कमी करू शकतो.
धनत्रयोदशीच्या दिवशी दिसून आलेले विक्रमी व्हॉल्यूम आणि ईजीआर ची निर्मिती ही या साधनाची वाढती स्वीकृती दर्शवणारे उत्साहवर्धक संकेत आहेत. आम्हाला खात्री आहे की अधिकाधिक गुंतवणूकदार आणि बाजार सहभागी भारताच्या सुवर्ण बाजारात सहभागी होण्याचा एक आधुनिक, नियमित आणि कार्यक्षम मार्ग म्हणून एनएसई ईजीआर चा स्वीकार करतील.”धनत्रयोदशीच्या दिवशी साध्य झालेला हा टप्पा, बदलत्या गुंतवणूकदारांच्या पसंतीनुसार नाविन्यपूर्ण बाजारसाधने विकसित करण्याच्या आणि भारताचा देशांतर्गत सुवर्ण बाजार मजबूत करण्याच्या व्यापक उद्दिष्टास हातभार लावण्याच्या एनएसई च्या कटिबद्धतेला बळकटी देतो.