Home Uncategorized स्थिर समभाग मूल्यवाढीसह उत्तम दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड सादर

स्थिर समभाग मूल्यवाढीसह उत्तम दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड सादर

18 second read
0
0
8

no images were found

स्थिर समभाग मूल्यवाढीसह उत्तम दर्जाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड सादर

  • बीएसई 500 मधील कंपन्यांपैकी 50 कंपन्यांमध्ये गुंतवणूक
  • मजबूत आर्थिक स्थिती आणि समभागांच्या किमतीत सातत्यपूर्ण तेजी असलेल्या कंपन्यांची निवड
  • बाजारातील बदलत्या संधींना प्रतिसाद देण्यासाठी गुंतवणूक पोर्टफोलिओचा वेळोवेळी आढावा

मुंबई, : आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सने आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड सुरू केला आहे. हा एक नवीन इक्विटी गुंतवणूक पर्याय असून कंपनीच्या बहुतांश युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन्स (ULIPs) अंतर्गत उपलब्ध असेल. या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मजबूत आर्थिक स्थिती आणि समभागांच्या किमतीत सकारात्मक कल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

     बीएसई 500 मधील अशा 50 समभागांच्या वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणुकीतून अधिक चांगला परतावा मिळवून देण्याच्या उद्देशाने या इंडेक्स फंडाची रचना करण्यात आली आहे. या कंपन्यांची निवड मोमेंटम (गुंतवणुकीतील गती) आणि क्वालिटी (गुणवत्ता) या दोन घटकांच्या एकत्रित निकषांवर केली जाते.

       या फंडच्या सादरीकरणाबद्दल बोलताना आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्सचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्री. मनीष कुमार म्हणाले, “आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड गुंतवणूकदारांना उच्च दर्जाचे व्यवसाय, भविष्यातील उत्पन्नाबाबत स्पष्टता आणि समभागांच्या किमतीत सातत्यपूर्ण तेजी असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करून दीर्घकालीन संपत्ती निर्माण करण्याचा एक प्रभावी मार्ग उपलब्ध करून देतो. विशेष म्हणजे, या फंडाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना मजबूत आर्थिक स्थिती असलेल्या कंपन्यांच्या पोर्टफोलिओमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. या कंपन्यांची निवड इक्विटीवरील परतावा,  कर्ज-इक्विटी गुणोत्तर आणि प्रति समभाग उत्पन्न यांसारख्या आर्थिक निकषांच्या आधारे तसेच गेल्या 12 महिन्यांत ज्यांच्या समभागांच्या किमतीत चांगली वाढ झालेली आहे त्यावरून केली जाते.

      हा इंडेक्स फंड बाजारातील चढ-उतारांचा सामना करताना दीर्घकालीन गुंतवणुकीच्या चक्रवाढ परताव्याचा लाभ ग्राहकांना घेता यावा, या आमच्या कंपनीच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे. अशा प्रकारे, ग्राहकांना एक शिस्तबद्ध गुंतवणूक चौकट उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यायोगे सातत्यपूर्ण वाढीचे रूपांतर त्यांच्या कुटुंबासाठी दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेत होऊ शकेल.”

     30 सप्टेंबर 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंडाने 7 वर्षांच्या कालावधीत 23.7% पर्यंत परतावा दिला आहे. याचा अर्थ असा की, 7 वर्षांपूर्वी या फंडात गुंतवलेल्या 1 लाख रु. रक्कमेचे आज 4.4 लाख रु. झालेले असू शकतात. याशिवाय, व्यवसायाच्या मूलभूत आर्थिक स्थितीत आणि बाजारातील संधींमध्ये होणाऱ्या बदलांनुसार फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये दर तिमाहीला पुनर्संतुलन केले जाते आणि आवश्यकतेनुसार त्यात बदल केले जातात.

     विशेष म्हणजे, आर्थिक वर्ष 2027 च्या पहिल्या सहामाहीत कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो 99.3% इतका होता. तसेच, ज्या दाव्यांसाठी तपासणीची आवश्यकता नव्हती अशा दाव्यांच्या निपटाऱ्यासाठी सरासरी 1.1 दिवसांचा कालावधी लागला. या कामगिरीतून ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गरजेच्या वेळी भक्कम साथ देण्याची कंपनीची बांधिलकी दिसून येते.

      आयसीआयसीआय लाइफ बीएसई 500 मोमेंटम क्वालिटी 50 इंडेक्स फंड कंपनीच्या बहुतांश ULIPs अंतर्गत उपलब्ध असेल. यामध्ये आयसीआयसीआय लाइफ प्रोटेक्ट एन गेन, आयसीआयसीआय लाइफ सिग्नेचर अश्युअर, आयसीआयसीआय लाइफ सिग्नेचर, आयसीआयसीआय लाइफ प्लॅटिनम आणि आयसीआयसीआय लाइफ वेल्थ एलिट प्रो या योजनांचा समावेश आहे. या योजनांमध्ये जीवन विमा संरक्षणासह गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध असून, अधिक माहितीसाठी www.icicilife.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे –      सार्वजनिक आरो…