no images were found
जितेंद्र आव्हाडांना जामीन मंजूर
ठाणे : येथील विवियाना मॉलमध्ये केलेली मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना अटक करण्यात आली होती. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आव्हाडांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. यावर युक्तिवाद होऊन जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने जमीन मंजूर केला आहे.
दरम्यान अटक केल्यापासून म्हणजे काल दुपारपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातल्या पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या मांडला आहे आता आव्हाडांकडून जामिनासाठी अर्जही दाखल करण्यात आला. या जामीन अर्जावर काही वेळातच सुनावणी झाली ठाण्यातल्या विवियाना मॉलमधल्या चित्रपटगृहामध्ये हर हर महादेव या चित्रपटाचा शो सुरू होता. या शो दरम्यान, आव्हाडांनी चित्रपट गृहात घुसून तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि प्रेक्षकांनां मारहाण केल्याचा आव्हाडांवर आरोप होता. व्यायालयाने जमीन मंजूर केल्याने आव्हाडांच्या तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.