no images were found
वेगळ्या स्टाईलमध्ये यशाची ताकद सेलिब्रेट करत, ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरने ‘द वन अँड ओन्ली’ केले प्रस्तुत
कोल्हापूर – ब्लेंडर्स प्राईड पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, पिढ्यान् पिढ्या यशाची वेगळीच लेव्हल सेट करणारा कल्चरल आयकॉन, आता त्याची नवीन मोहिम ‘द वन अँड ओन्ली’ घेऊन आलाय – जी आहे यशाची एकदम दमदार आणि फ्रेश स्टोरी. आजच्या जगात यशाची चिन्हं सगळीकडेच दिसतात, आणि स्पर्धाही जबरदस्त वाढलीये. पण ब्रँड पुन्हा एकदा तेच सांगतो – खरं यश वेगळेपणात आहे – जे लोकांना आपोआप प्रभावी करते आणि माणसाला सगळ्यांपेक्षा खूप पुढे नेऊन उभं करतो.
नव्या मोहिमेमध्ये हा जोश तीन जबरदस्त चेहऱ्यांमधून दिसतो — अवंती नगराथ, किरणदीप चहल आणि माहिका शर्मा — आणि प्रत्येक जण ब्रँडचा वेगळा अंदाज दाखवतो. अवंती तिच्या बिनधास्त आत्मविश्वास आणि स्वतःची वेगळी ओळख यामुळे जबरदस्त करिश्मा पसरवते, किरणदीप तिच्या जबरी आकर्षण आणि कुणालाही खुश करण्याची गरज न भासणारी दमदार उपस्थितीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेते. तर माहिका तिच्या शांत पण रॉयल स्वभावामुळे आणि सूक्ष्म आकर्षणामुळे लोकांना थक्क करून टाकते. सगळीकडे भरपूर स्पर्धा असलेल्या या आशादायी जगात त्या तिघी आणि त्यांच्यासोबत ब्रँड — कायम बाकी सगळ्यांवर भारी ठरतात आणि सभोवताली असलेल्या लोकांवर आपोआप छाप पाडतात.
स्टाईल आणि दमदार आशयावर उभा असलेला हा ब्रँड, नवकल्पकतेमध्ये पुढे राहून, उद्योगामध्ये अनेक क्षेत्रात प्रथम येऊन आणि फेमस आणि हटके फॅशन प्लॅटफॉर्म तयार करून – आधुनिक भारतीय संस्कृतीवर आशादायी यशाची दिशा कायम सेट करत आलाय.
आता ‘द वन अँड ओन्ली’ सोबत तो आपल्या पुढच्या टप्प्यात वाटचाल करतोय — थेट त्या नव्या पिढीशी बोलतोय जी फक्त ओळख मिळवण्यासाठी नाही, तर लोकांना इम्प्रेस करून आदर आणि प्रभाव मिळवण्यासाठी धडपडते.
ही 360 डिग्री इंटिग्रेटेड मोहिम आता डिजिटल आणि सोशल मीडियावर सुरू आहे, त्यात चालू असलेला ICC T20 वर्ल्ड कप, मोठ्या बातम्यांच्या पेपर्सवरील मुख्य पानावरच्या जाहिराती आणि मोठ्या शहरांतील परिणामकारक बाहेरील जाहिरात पोस्टर्स सगळं सामील आहे. यामुळे ब्रँडची ओळख आणि प्रसिद्धी भरपूर वाढते आणि त्याची सांस्कृतिक नेतृत्वाची ताकद पुन्हा दिसून येते.
पर्नोड रिकार्ड इंडियाचे मुख्य विपणन अधिकारी देबश्री दासगुप्ता म्हणाल्या की, “ब्लेंडर्स प्राईड नेहमीच स्टाइल आणि प्रतिष्ठेसह यशाच्या ताकदीवर विश्वास ठेवतो. ‘द वन अँड ओन्ली’ यशाची एक नवी आणि ठाम कल्पना घेऊन आली आहे, जी वेगळेपणावर चालते. ती हे दाखवते की, आजच्या भारतातील महत्वाकांक्षी तरुण फक्त यशस्वी होण्यावर नाही, तर आत्मविश्वासाने आणि हटकेपणाने सगळ्यांपेक्षा वेगळे दिसण्याकडेही लक्ष देतात. या यशाच्या गोष्टीतून ब्लेंडर्स प्राईड तरुणांच्या मोठ्या आकांक्षांना साकार करतो आणि त्याचबरोबर आपल्या प्रेरणादायी सांस्कृतिक नेतृत्वाची ओळख अधिक मजबूत करतो.”
नवीन फिल्म येथे बघा: www.youtube.com/watch?v=-z3YH-R-QiM
अधिक अपडेट्ससाठी फॉलो करा: www.instagram.com/blenderspridefashiontour