Home शासकीय आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

8 second read
0
0
38

no images were found

आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे निर्देश

कोल्हापूर,  : शेतकऱ्यांना हमीभावाचा लाभ मिळावा आणि त्यांना शेतीमाल विक्रीसाठी सुलभ सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रांची संख्या वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. यंदाच्या २०२५-२६ खरेदी हंगामाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. धान, नाचणी आणि सोयाबीनच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर सोयीस्कर सुविधा मिळावी, यावर विशेष भर देण्यात आला आहे.
     
जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले की, ग्रामीण आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही योग्य दर आणि धानासाठी अतिरिक्त बोनस मिळावा, यासाठी नवीन खरेदी केंद्रे प्रस्तावित करणे गरजेचे आहे. यंदा धानाला २,३६९ रुपये, रागीला ४,८८६ रुपये आणि सोयाबीनला ५,३२८ रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव निश्चित झाला आहे. या बैठकीत पणन महासंघाला सर्व तालुक्यांमध्ये धान्य खरेदी केंद्रांसाठी उपअभिकर्ता संस्थांची नेमणूक करण्याचे निर्देश देण्यात आले. इच्छुक सहकारी तालुका खरेदी-विक्री संघ, सहकारी संस्था आणि फार्मर प्रोड्युसर संस्थांना पणन महासंघाच्या अटी व निकषांनुसार प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. प्रस्ताव सादर करण्यासाठी शेतकरी आणि संस्थांनी जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले.
      
या बैठकीला जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) नीलकंठ करे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, जिल्हा पणन अधिकारी गजानन मगरे, पणन महासंघाच्या संचालिका धनश्रीदेवी घाटगे यांच्यासह जिल्ह्यातील सहकारी खरेदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे यांनी गाव पातळीवर महसूल विभागाच्या सहाय्याने हमीभाव केंद्रांबाबत जनजागृती करण्याचे निर्देश दिले. शेतकऱ्यांनी ‘पीक पाहणी’ पोर्टल तसेच शासनाच्या विविध ऑनलाइन व्यासपीठांवर नोंदणी करून आपला शेतमाल हमीभावाने विक्रीसाठी सादर करावा, असे आवाहन त्यांनी केले. नोंदणीसाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुकची झेरॉक्स, मोबाइल नंबर आणि पिकाची माहिती यासारखी कागदपत्रे सादर करावी लागतील. ऑनलाइन नोंदणीसाठी OTP पडताळणी आणि आधार/e-KYC प्रक्रिया पूर्ण करून अर्ज सबमिट करावा लागेल.

*शेतकऱ्यांनी हमीभाव मिळावा म्हणून काय करावे?*
• नोंदणी: जवळच्या अधिकृत प्रस्तावित केंद्रावर किंवा ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करा.
• कागदपत्रे: आधार कार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक आणि पिकाची माहिती तयार ठेवा.
• संपर्क व माहिती साठी : कृषी सहायक, तलाठी, तालुका कृषी विभाग, तहसील कार्यालय किंवा जिल्हा पणन अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधा.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शासकीय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ

‘बायको पाहिजे’चं पोस्टर, सोशल मीडियावर धुमाकूळ सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच चेहरा प्…