no images were found
मंत्रालयात पुनम ताई तोडकर यांनी घेतली छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट; विविध सामाजिक व जनहिताच्या प्रकल्पांवर सकारात्मक चर्चा
कोल्हापूर (प्रतिनिधी):-नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा माननीय शर्विका ताई उर्फ पूनम ताई तोडकर यांनी मंत्रालय येथे महाराष्ट्र शासनाचे ज्येष्ठ नेते तथा माननीय छगन भुजबळ साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.
या भेटीदरम्यान महिला सक्षमीकरण, महिला आरोग्य, रोजगारनिर्मिती, शैक्षणिक विकास तसेच ग्रामीण भागातील नागरिकांच्या विविध समस्या आणि सामाजिक विकासाशी संबंधित प्रस्तावित प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.समाजातील गरजू, वंचित घटक, महिला आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या प्रकल्पांना योग्य दिशा, मार्गदर्शन आणि शासनस्तरावर सहकार्य मिळावे, याबाबत माननीय भुजबळ साहेबांशी विचारविनिमय करण्यात आला.
या प्रसंगी माननीय छगन भुजबळ साहेबांनी दिलेले मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल शर्विका ताई यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.पदापेक्षा समाजसेवेचे ध्येय मोठे, आणि प्रसिद्धीपेक्षा जनतेचा विश्वास महत्त्वाचा, या विचारातून समाजहिताचे कार्य अधिक व्यापक करण्याचा त्यांचा संकल्प आहे.