Home Uncategorized बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! – ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! – ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

0 second read
0
0
12

no images were found

बाबूजींचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचं नातं; भरभरुन प्रेम दिल्याबद्दल कोल्हापूरकरांना धन्यवाद ! – ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके

कोल्हापूर : देव देव्हाऱ्यात नाही.. देव नाही देव्हारे.., सखी मंद झाल्या तारका.., कानडा राजा पंढरीचा.., ओंकार स्वरुपा सद्गुरु समर्था.. तुज नमो.., फिटे अंधाराचे जाळे.. आकाशी झेप घेरे पाखरा, तोडी सोन्याचा पिंजरा.., कानडा राजा पंढरीचा.., तेजोमय नाद ब्रम्ह हे.. जय शारदे वागेश्वरी.., येवो विठ्ठले.. भक्तजन वत्सले.. अशी अनेक अजरामर भाव, भक्तीगीते, प्रेमगीते सादर करुन ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांनी कोल्हापूरकरांची मने जिंकली. त्यांनी सादर केलेल्या अनोख्या सूरमयी प्रवासात रसिक हरवून गेले. गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली साकोलीकर यांनी सुरेल साथ देत अनेक गीते सादर केली. यावेळी सादर केलेल्या गीतांना रसिकांनी “वन्स मोअर” म्हणत टाळ्यांच्या कडकडाटात भरभरुन दाद दिली.

गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात भक्ती, संस्कृती, कला आणि सामाजिक एकोप्याचा उत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू स्मारक भवन येथे “महागणेशोत्सव” निमित्त ज्येष्ठ संगीतकार व गायक श्रीधर फडके यांच्या सुगम संगीताचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक डॉ. निलोत्पल, गुणीदास फाउंडेशनच्या अध्यक्षा सुश्मिता सप्रे, संस्थापक राजप्रसाद धर्माधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

देव देव्हाऱ्यात नाही.. देव नाही देव्हारे या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.. फुलले रे क्षण माझे.., मन कशातच लागत नाही.., आदी माया अंबाबाई.., तुला पाहिले.. नदीच्या किनारी.., तू कधी वेणीस फुल खोवतेस ना.., बाई मी विकत घेतला शाम.., तूच चंद्रमा नभात.., माता भवानी जगताची जननी.. अशी अनेक गीते, अभंग, भाव, भक्तीगीते, प्रेमगीते, लावणी सादर करत रसिकांची दाद मिळवली. पहिल्या गीतापासूनच कोल्हापूरकरांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. जगदीश खेबुडकर, सुधीर मोघे, सुरेश भट, ग्रेस यांच्या सह अनेक दिग्गज गीतकारांची गीते श्रीधर फडके यांनी सादर केली. यावेळी

गायिका शिल्पा पुणतांबेकर व शेफाली साकोलीकर यांनी सुरेल गायन करत उत्तम साथ दिली. तबल्यासाठी तुषार आगरे, बासरीसाठी डॉ. सचिन जगताप, की बोर्ड साठी सुनील गुरव, साईड रिदम ला अनिकेत ससाने यांनी उत्तम साथ दिली. “आयुष्य आणि अध्यात्म यांना जोडणारा दुवा म्हणजे संगीत”.. “सुंदर गायन तिथे रंगले मन..” अशा शब्दात सुकन्या जोशी यांनी केलेल्या उत्कृष्ट निवेदनाने कार्यक्रम अधिक खुलत गेला. संदीप चव्हाण यांनी ध्वनी व्यवस्था केली. तर मिलिंद अष्टेकर यांनी रंगमंच व्यवस्था व सागर भोसले यांनी सजावट केली.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज

सार्वजनिक गणेश विसर्जनासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज –आयुक्त डॉ. राजेंद्र&…