
no images were found
एनडीए परीक्षेत बारामतीचा चैतन्य आवळे २२ वा
बारामती : देशात नॅशनल डिफेन्स अँकॅडमी (NDA) परीक्षेमध्ये २२ व्या क्रमांकाने बारामतीचा चैतन्य आवळे हा उत्तीर्ण झाला. दरवर्षी सुमारे आठ लाख विद्यार्थ्यांचा या परिक्षेत सहभागी असतात. लेखी व एसएसबी मुलाखतीच्या माध्यमातून चैतन्य आवळेने यश खेचून आणले. एनडीए १४९ कोर्सची लेखी परिक्षा उत्तीर्ण होऊन ३४ एस.एस.बी. अलाहाबाद मधून त्याची शिफारस झाली आहे. चैतन्यचे प्राथमिक शिक्षण सैनिक स्कूल सातारा येथे झाले असून पुढे त्याने बारामतीच्या आचार्य अँकॅडमीतून शिक्षण घेतले. आचार्य अकॅडमीच्या सुमित सिनगारे यांचे त्याला या परीक्षेसाठी मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल आचार्य अकॅडमीचे संचालक संस्थापक ज्ञानेश्वर मुटकुळे, संचालक कमलाकर टेकवडे, संचालक सुमित सिनगारे आणि संचालक प्रवीण ढवळे यांनी अभिनंदन केले. यावेळी त्याने असे सांगितले की, वडील डॉ. महादेव आवळे, आई सुरेखा आवळे यांचेही माझ्या यशात योगदान आहे. लेखी परिक्षेत उत्तीर्ण होत होतो, परंतु मुलाखतीत अपयशी होत होतो, जिद्दीने तयारी केली प्रयत्न केले आणि यश मिळाले.