
no images were found
किटवाड धबधब्यात चार महाविद्यालयीन तरुणींचा बुडून मृत्यू
चंदगड : तालुका चंदगड (जि. कोल्हापूर) येथील किटवाड धबधब्यामध्ये बेळगावमधील ४ महाविद्यालयीन तरुणींचा बुडून मृत्यू झाला. एका तरुणीला बाहेर काढण्यात यश मिळालेले आहे.
तालुका चंदगड (जि. कोल्हापूर) येथील किटवाड धबधब्यात बुडून बेळगावमधील 4 महाविद्यालयीन तरुणींचा मृत्यू झाला. एका तरुणीला बाहेर काढण्यात यश मिळाले असून तिला उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. असिया मुजावर (वय 17, उज्वल नगर), कुदासिया पटेल (वय 20, अनगोळ), रुक्षार बिस्ती (वय 20) आणि तस्मिया (वय 20) या तरुणींचा बुडून मृत्यू झाला आहे. बेळगाव येथून 40 कॉलेज तरुणींचा गट विकेंड साजरा करण्यासाठी किटवाड धबधबा या ठिकाणी गेल्या होत्या. दरम्यान पाच तरुणी सेल्फी काढण्यासाठी थांबल्या होत्या. सेल्फी काढत असताना पाय घसरल्यामुळे तरुणी पडल्या आणि धबधब्यात बुडून चौघींचाही मृत्यू झाला. चंदगड पोलिसात या दुर्घटनेची नोंद झाली आहे.