Home शैक्षणिक विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा

2 second read
0
0
8

no images were found

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा : डी. वाय. पाटील विद्यापीठात ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण शिबिर संपन्न

कोल्हापूर(प्रतिनिधी):- विज्ञान प्रदर्शन आणि प्रयोगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील संकल्पना प्रत्यक्ष अनुभवातून समजतात. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची जिज्ञासा, निरीक्षणशक्ती, तर्कशक्ती आणि सर्जनशीलता विकसित होते. विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे केवळ अभ्यासाचा विषय म्हणून न पाहता प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहावे, असे आवाहन डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी केले.

कदमवाडी येथील डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर सायंटिफिक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, भारतीय युवा विज्ञान अकादमी (INYAS) आणि इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ‘ग्रामीण विज्ञान शिक्षण प्रशिक्षण’ शिबिराच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. ग्रामीण भागातील इयत्ता सातवी ते नववीच्या १६० हून अधिक विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग घेतला.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक प्रयोगांकडे केवळ प्रात्यक्षिक म्हणून न पाहता त्यामागील कारणांचा विचार करावा, असे आवाहन केले. प्रयोगातून जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे आणि त्या जिज्ञासेतून नवे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. प्रश्न विचारण्याची व त्यांची उत्तरे शोधण्याची वृत्तीच विद्यार्थ्यांना भविष्यात संशोधनाच्या क्षेत्राकडे घेऊन जाईल, असे त्यांनी सांगितले.

या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोगांची प्रात्यक्षिके, विज्ञान प्रश्नमंजुषा, सूक्ष्मदर्शकाचे प्रात्यक्षिक, संशोधन प्रयोगशाळा व सिम्युलेशन लॅबला भेट तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेत विज्ञानातील संकल्पना समजून घेतल्या.

यावेळी कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्चचे अधिष्ठाता प्रा. सी. डी. लोखंडे, कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अश्विनी काळे, सहसंयोजक डॉ. जयवंत गुंजकर, डॉ. अर्पिता पांडे तिवारी, आयुकाचे रुपेश लबडे, जाहिदा शेख यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक
Comments are closed.

Check Also

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम: जिल्ह्यातील सा…