Home सामाजिक गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम

11 second read
0
0
4

no images were found

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा; सांस्कृतिक कार्य विभागाची विशेष मोहीम: जिल्ह्यातील सार्वजनिक मंडळे व नागरिकांनी सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी
कोल्हापूर  : महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक अस्मिता आणि परंपरा असलेल्या गणेशोत्सवाला राज्य शासनाने ‘राज्य महोत्सव’ म्हणून दर्जा दिला आहे. ही गौरवशाली परंपरा, कला, लोकजीवन, हस्तकला व सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिपत्याखालील पुरातत्त्व संचालनालयामार्फत ‘Bappa.org’ हे डिजिटल व्यासपीठ सुरू करण्यात आले आहे. या मोहिमेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गणेशोत्सवाला युनेस्कोचा वारसा दर्जा (UNESCO Heritage Status) व अन्य जागतिक मानांकने मिळवून देण्यासाठी व्यापक प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमात कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नागरिक, शाळा-महाविद्यालये आणि कलाकारांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे डिजिटल दस्तऐवजीकरण :
नागरिकांना आपल्या घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची छायाचित्रे, व्हिडिओ, सजावट, धार्मिक-सांस्कृतिक परंपरा, लोककला आणि खाद्यपरंपरा यांची माहिती Bappa.org या संकेतस्थळावर किंवा WhatsApp (91361 72681) द्वारे नोंदवता येईल.
शासकीय अधिकृत प्रमाणपत्र :
आपल्या घरगुती गणेशोत्सवाची कथा व वैशिष्ट्ये नोंदवणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला सांस्कृतिक कार्य विभागातर्फे अधिकृत ‘Digital Cultural Preserver Certificate’ देण्यात येणार आहे.
विविध घटकांचा सक्रिय सहभाग :
चित्रकला, निबंध व व्हिडिओ निर्मिती स्पर्धेद्वारे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे, सहकारी गृहनिर्माण संस्था, निवासी संघटना व ग्रामपंचायतींच्या WhatsApp ग्रुप्सवरून नोंदणी लिंक प्रसारित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कला व कलाकारांची नोंदणी :
गणेशोत्सवाशी संबंधित लोककलावंत, मूर्तिकार, हस्तकलाकार व स्थानिक कला परंपरांची माहिती संकलित करून या डिजिटल व्यासपीठावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधून काम करावे आणि नागरिकांनी या ऐतिहासिक उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राची ही लोकचळवळ जागतिक स्तरावर नेण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा

विज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्मा : डी. वाय. पाटील …