
no images were found
‘जाने अनजाने हम मिले’ मधील आपल्या रील आणि रीयल लग्नाबद्दल सांगत आहे आयुषी खुराणा
झी टीव्हीवरील ‘जाने अनजाने हम मिले’ या मालिकेतील मनाची पकड घेणारे नाट्य. मनोवेधक कथानक आणि उत्तम ऑनस्क्रीन केमिस्ट्री असलेल्या व्यक्तिरेखा यांचा मिलाफ प्रेक्षकांना आवडत आहे. राघव आणि रीत यांच्या भूमिका साकारणारे अनुक्रमे भरत अहलावत आणि आयुषी खुराणा ही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली असून त्यांच्या ‘लव-हेट डायनामिक’ला चाहते खिळून आहेत. हल्लीच्या भागांमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाले की कसे रीत आणि राघव यांचे आटा साटा विवाह परंपरेअंतर्गत लग्न होते, ज्यातून त्यांच्या भावंडांचे भविष्य सुरक्षित केले जाते. योगायोगाने आयुषीचेही लग्न खऱ्या आयुष्यात त्याच वेळेस झाले.
आयुषीची व्यक्तिरेखा रीत ही आपल्या भावासाठी एक मोठा त्याग करून या मालिकेमध्ये राघवसोबत लग्न करत असताना आयुषी स्वतःसुद्धा तिच्या दीर्घकाळच्या भागीदार आणि आता तिच्या पतीसोबत खऱ्या आयुष्यातही लग्नाची तयारी करत होती. रीतचे ऑनस्क्रीन लग्न हा एक भव्य सोहळा होता त्यात हळदी, मेहंदी आणि फेरा हे कार्यक्रम अतिशय उत्तम पद्धतीने प्रेक्षकांसमोर साकारण्यात आले. यासोबत आयुषी अतिशय शांतपणे आपल्या स्वतःच्या खास दिवसाचीही तयारी करत होती. हे जणू एकच स्वप्न दोन वेळा जगण्याचा अनुभव होता. आणि दोन्ही लग्नांमध्ये प्रेम परंपरा आणि आनंदाची झालर होती.
आयुषी म्हणाली, “असं वाटलं की जणू आयुष्याने मला माझ्या स्वतःच्या लग्नासाठी एक पर्फेक्ट ड्रेस रिहर्सल प्रदान केली. ज्या सगळ्या परंपरा आम्ही सेटवर परफॉर्म केल्या जवळपास तशाच सर्व परंपरा माझ्या खऱ्या लग्नातही पार पाडण्यात आल्या. त्यामुळे जेव्हा माझे खरे लग्न होते त्या दिवसासाठी मी पूर्णपणे तयार होते. तू एक आगळावेगळा अनुभव होता. पडद्यावरील माझे लग्न हे भव्य आणि सिनेमॅटिक होते ज्यात कथाकथनाच्या जादूची भर घालण्यात आली होती तर माझे खरे लग्न हे अतिशय जिव्हाळयाचे मनापासून केलेले आणि अतिशय अर्थपूर्ण असे होते. एवढा सुंदर अनुभव दोन वेळा जगण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही आणि मला ती मिळाली, एकदा ऑनस्क्रीन आणि एकदा खऱ्या आयुष्यात, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. ही एक अशी गोष्ट आहे जी मी आयुष्यभर माझ्या मनात सांभाळून ठेवेन.”
आता आयुषी आपल्या खासगी आणि प्रोफेशनल अशा दोन्ही बाबतीत एका नवीन पर्वात प्रवेश करत असून रील आणि रीयल लाइफ अशा दोहोंमधील सुनेच्या जबाबदारीसाठी कृतज्ञ आणि आनंदी आहे.
आगामी भागांमध्ये प्रेक्षकांसाठी हे पाहणे रोचक ठरेल की राघवचा परिवार तिचे कसे स्वागत करतो आणि नवीन सून म्हणून तिच्याशी कसे वर्तन करतो तसेच रीत त्यांना कसे हाताळते आणि घरातील आपल्या हक्कांसाठी कशी लढते.