
no images were found
‘तेनाली रामा’ मालिकेत पंकज बेरी पुन्हा एकदा धूर्त राजगुरु तथाचार्यांच्या भूमिकेत दिसणार!
सोनी सबवर अलीकडेच सुरू झालेल्या तेनाली रामा मालिकेत यावेळी नवीन गोष्टी असणार आहेत. या मालिकेत अभिनेता पंकज बेरी पुन्हा एकदा धूर्त आणि चाणाक्ष राजगुरु तथाचार्यची भूमिका साकारत आहे.कावेबाज आणि धूर्त स्वभावामुळे तथाचार्य ही व्यक्तिरेखा लोकांना आवडली होती. तथाचार्य या मालिकेत नेहमी तेनालीशी (कृष्ण भारद्वाज) शाब्दिक द्वन्द्व करताना दिसतात.
तथाचार्य हे राजा कृष्णदेवराय (आदित्य रेडीज) च्या दरबारातील विद्वान आणि सल्लागार होते. तेनाली विजयनगरला परततो तेव्हा ते त्याच्या मार्गात अडथळे निर्माण करत राहतात. एके काळी विजयनगरमधून बहिष्कृत करण्यात आलेला तेनाली पुन्हा या राज्यात येतो, तेव्हा त्याच्यावर कुरघोडी करून राजा कृष्णदेवरायाच्या दरबारातील आपले प्रभुत्व कायम राखण्यासाठी तथाचार्यांचे खटाटोप सुरू होतात. त्या दोघांमध्ये नेहमी शाब्दिक चकमक होत राहते आणि तेनालीला नामोहरम करण्याच्या तथाचार्यांच्या प्रयत्नातून काही तरी भलतेच परिणाम होतात, ज्यामुळे त्यांच्यातील ही चकमक रंजक होते. त्या दोघांचे सख्य चमत्कारिक आहे.
आपल्या व्यक्तिरेखेविषयी बोलताना पंकज बेरी म्हणतो, “तथाचार्य वाक्पटू आहे, खोडकर आणि मोहकही आहे त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना आव्हान असते, तसाच आनंदही असतो. त्याच्यातील विक्षिप्तपणा आणि विनोदी स्वभाव जिवंत करण्याचा अनुभव आनंद देणारा असतो. तथाचार्य या व्यक्तिरेखेत मनोरंजन करण्याचा अजब गुण आहे, जो मला फार आवडतो. हे मनोरंजन तेनालीशी असलेल्या वैरातून होते किंवा त्यांच्या गंमतीशीर कृत्यांमधून. अशा भूमिका दुर्मिळ असतात आणि ही व्यक्तिरेखा जिवंत करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना आमच्यासोबत हा प्रवास करताना आनंद मिळेल.”