
no images were found
लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे निधन
मुंबई : मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून आपल्या गायनाने वेड लावणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबई येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.
यंदाच्या साली कला क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना लता मंगेशकर पुरस्काराने (२०१०), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०१२) ने सन्मानित करण्यात आले होते. सुलोचना चव्हाण यांचा जन्म १३ मार्च, १९३३ रोजी झाला होता. मराठी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’, ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ अशा त्यांच्या गाजलेल्या लावण्या आहेत. त्यांनी ‘रंगल्या रात्री’ चित्रपटासाठी पहिली लावणी गायली होती. हिंदी चित्रपटासाठीही त्यांनी गाणी रेकॉर्ड केली होती. सुलोचनाबाईंच्या रूपानं लावणीची नजाकत हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.