no images were found
२०१८ संपात ST कर्मचाऱ्यांचे २ दिवसांचे वेतन कपात
मुंबई : ८ आणि ९ जून २०१८ मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामध्ये सहभागी झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळ प्रशासनाकडून आता धक्का देण्यात आला आहे. एक दिवस जो कर्मचारी गैरहजर असेल त्याचे दोन दिवसाचे वेतन कपात केलं जाणार आहे. याबाबतच्या सूचना राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने दणका दिल्याचं मानलं जात आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ८ आणि ९ जून २०१८ मध्ये संप पुकारला होता. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला होता. जे कर्मचारी संपात सहभागी झाले तेव्हा अशा कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या गैरहजरीसाठी आठ दिवसाचे वेतन कपात करण्या चे आदेश देण्यात आले होते. मात्र, औद्योगिक न्यायालयाने या वेतन कपातील स्थगिती दिली होती. आता औद्योगिक न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीला हिरवा झेंडा दाखवला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार एक दिवस गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्याचे दोन दिवसाचे वेतन कपात केलं जाणार आहे. याबाबतचा आदेश एसटी महामंडळाचे महाव्यवस्थापक अजित गायकवाड यांनी काढून वेतन कपात करण्यासंदर्भात सर्व विभाग नियंत्रक यांना सूचना दिल्या आहेत.