Home सामाजिक स्‍कोडा ऑटो इंडियाकडून ऑगस्‍ट २०२३ साठी एक्‍स्‍चेंज कार्निवल लाँच

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून ऑगस्‍ट २०२३ साठी एक्‍स्‍चेंज कार्निवल लाँच

2 min read
0
0
28

no images were found

स्‍कोडा ऑटो इंडियाकडून ऑगस्‍ट २०२३ साठी एक्‍स्‍चेंज कार्निवल लाँच

कोल्हापूर : स्‍कोडा ऑटो इंडियाने ऑगस्‍ट २०२३ साठी एक्‍स्‍चेंज कार्निवल लाँच केला. या कार्निवलमध्‍ये अनेक ग्राहक-अनुकूल डिल्‍स, सूट व सेवा, देखरेख आणि वॉरंटी पॅकेजेसचा समावेश आहे, जे ग्राहकांच्‍या त्‍यांच्‍या नवीन स्‍कोडा कार्सच्‍या मालकीहक्‍क अनुभवामध्‍ये अधिक वाढ करतात.

एक्‍स्‍चेंज कार्निवलचा स्‍कोडा कार खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांना मूल्‍य व उत्तम मालकीहक्‍क अनुभव प्रदान करण्‍याचा मनसुबा आहे. ऑगस्‍ट २०२३ साठी एक्‍स्‍चेंज कार्निवल ग्राहकांना संस्‍मरणीय व उच्‍च मूल्‍याच्‍या कार खरेदी आणि एक्‍स्‍चेंज अनुभव मिळण्‍याची खात्री देतो. तसेच काही संस्‍मरणीय देखरेख व वॉरंटी पॅकेजेस् खात्री देतात की ग्राहक विनासायास मालकीहक्‍क अनुभवासह स्‍कोडा कार्सचा आनंद घेत राहतील.

एक्‍स्‍चेंज कार्निवल अंतर्गत स्‍कोडा ऑटो इंडिया जवळपास ६०,००० रूपयांपर्यंत फायदे आणि जवळपास ७०,००० रूपयांपर्यंत कॉर्पोरेट फायदे देते. ग्राहक त्‍यांची इच्‍छा असल्‍यास त्‍यांच्‍या विद्यमान कारसह ड्राइव्‍ह इन करू शकतात आणि जलद व त्रासमुक्‍त, सिंगल-विंडो, एकच वेळ एक्‍स्‍चेंज, खरेदी व डॉक्‍यूमेन्‍टेशन अनुभवासाठी स्‍कोडासह ड्राइव्‍ह आऊट करू शकतात. यामधून त्‍यांना त्‍यांच्‍या विद्यमान कारसाठी संभाव्‍य सर्वोच्‍च मूल्‍य आणि त्‍यांच्‍या नवीन स्‍कोडासाठी अनेक खरेदी लाभ, देखरेख व वॉरंटी पॅकेजेस् मिळतील.

या एक्‍स्‍चेंज कार्निवल अंतर्गत त्‍यांच्‍या जुन्‍या कार्ससाठी सर्वोत्तम मूल्‍य मिळण्‍याव्‍यतिरिक्‍त ग्राहकांना त्‍यांच्‍या नवीन स्‍कोडा कार्ससाठी ४ वर्षांकरिता कॉम्‍प्‍लीमेण्‍टरी सर्विस व मेन्‍टेनन्‍स पॅकेज देखील मिळेल. याव्‍यतिरिक्‍त ग्राहकांना जवळपास ४,००० रूपयांपर्यंत विस्‍तारित वॉरंटी फायदे मिळतील,ज्‍यामुळे हा एक्‍स्‍चेंज कार्निवल जुन्‍या कार्ससाठी मोठे मूल्‍य प्राप्‍त करण्‍यासाठी आणि स्‍कोडा कार्ससह अद्वितीय मालकी हक्‍क अनुभवासाठी वॉरंटी व मेन्‍टेनन्‍स पॅक्‍स संपादित करण्‍यासाठी अगदी योग्‍य काळ आहे.

Load More Related Articles

Check Also

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे  

तेनाली रामा’ मालिकेने विनोद आणि बुद्धीचातुर्याच्या अविस्मरणीय एपिसोड्सचे शतक साजरे   …