no images were found
कलाकारांनी सांगितले त्यांच्या ‘पॉ-अॅडोरेबल’ पाळीव कुत्र्यांना ठेवलेल्या नावांबाबतचे किस्से
कुत्र्यांनी त्यांच्या प्रेमळ कृत्यांसह माणसांचा जिवलग सोबती म्हणून स्वत:ला नेहमी सिद्ध केले आहे. ते सतत आपल्याला त्यांच्या या दयाळू कृत्यांची आठवण करून देतात. नेहमीच्या व्यस्त कामकाजामधून आपल्या या पाळीव मित्राकडे परतल्यानंतर अद्भुत व उत्साहवर्धक वाटते. ते आपला मानसिक ताण दूर करतात. या प्रेमळ चार-पायाच्या मित्रांना ‘पॉ-अॅडोरेबल’ शब्द अगदी योग्य आहे. इंटरनॅशनल डॉग डे निमित्त कलाकार त्यांच्या कुत्र्यांबाबत सांगण्यासोबत त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याला दिलेल्या नावाबाबत रोचक कथा सांगत आहेत. हे कलाकार आहेत गीतांजली मिश्रा (मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील राजेश), आयुध भानुशाली (मालिका ‘दूसरी माँ’मधील कृष्णा) आणि विदिशा श्रीवास्तव (मालिका ‘भाबीजी घर पर है’मधील अनिता भाबी). मालिका ‘हप्पू की उलटन पलटन’मधील गीतांजली मिश्रा ऊर्फ राजेश म्हणाल्या, ”मला कुत्रे खूप आवडतात, इतके की मी माणसांपेक्षा त्यांना जास्त प्राधान्य देते. माझ्या मते कुत्रे माणसांचे सर्वोत्तम सोबती आहेत. मी माझ्या मैत्रिणींच्या घरी जाते तेव्हा त्यांच्यासोबत वेळ व्यतित न करता त्यांच्याकडे असलेल्या कुत्र्यासोबत अधिक वेळ व्यतित करते. कधी–कधी त्या त्याबाबत तक्रार देखील करतात (हसते). मी लॅब्रोडोर कुत्रा दत्तक घेतला आहे. माझ्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे मी माझ्या मैत्रिणीकडे त्याला ठेवते, ज्यामुळे त्याच्याकडे सतत लक्ष दिले जाते. आम्ही पहिल्यांदा भेटलो तेव्हा तो माझ्यावर खूप भुंकला आणि त्याच्या भुंकण्याचा आवाज ‘बम बम’ ऐकू येत होता, म्हणून मी त्याचे नाव बम बम ठेवले. भगवान शिवची निस्सीम भक्त असल्यामुळे त्याचे नाव घेताना मला भगवान शिवची आठवण येते. त्याची उपस्थिती माझ्या जीवनात सकारात्मकता व आनंद आणते. यंदा इंटरनॅशनल डॉग डे निमित्त माझा सल्ला आहे की, प्रत्येकाने कुत्रा दत्तक घ्या आणि तुमच्या जीवनात येणारी सकारात्मकता व उत्साहाचा आनंद घ्या.”