no images were found
१०५० कोटी रुपयांपर्यंतच्या आयपीओ साठी सेबीकडे डीआरएचपी सादर
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेड ही भारतातील मालमत्तेची मालकी असलेल्या हॉटेल चेनमधील ८ वी सर्वात मोठी हॉटेल साखळी आहे (स्रोत: हॉरवथ एचटीएल अहवाल). ते “द पार्क”, “द पार्क कलेक्शन”, “झोन बाय द पार्क”, “झोन कनेक्ट बाय द पार्क” आणि “स्टॉप बाय झोन” या स्वतःच्या ब्रँड्स अंतर्गत हॉस्पिटॅलिटी मालमत्ताचे काम करतात.
एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स लिमिटेडने आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“डीआरएचपी“) बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी“) कडे दाखल केला आहे. कंपनीने १०५० कोटी रुपयांपर्यंतच्या प्राथमिक समभाग विक्रीतून इक्विटी समभागांच्या ऑफरद्वारे (प्रत्येकी दर्शनी मूल्य १) निधी उभारण्याची योजना आखली आहे. या ऑफरमध्ये एकूण ६५० कोटी रुपयांपर्यंतच्या (“फ्रेश इश्यू”) इक्वीटी समभागांच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे आणि ४०० कोटी रुपयांपर्यंत भागधारकांनी विक्रीसाठी ऑफर केली आहे (“विक्रीची ऑफर”).
कंपनीने फ्रेश इश्यूमधील निव्वळ उत्पन्न वापरण्याचा प्रस्ताव ठेवला आहे (i) कंपनीने घेतलेल्या अंदाजे ५५० कोटी रुपयांपर्यंतच्या काही थकबाकी कर्जाच्या पूर्ण किंवा काही अंशी भागाच्या परतफेड/पूर्वफेड साठी; आणि (ii) सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी शिल्लक रक्कम.
विक्रीच्या ऑफरमध्ये एपीजे सुरेंद्र ट्रस्ट (“प्रवर्तक विक्री भागधारक”) द्वारे ८००.०० दशलक्ष रुपयांपर्यंत, एपीजे प्रायव्हेट लिमिटेड द्वारे २,९६०.०० दशलक्ष रुपयांपर्यंत (“प्रवर्तक समूह विक्री भागधारक”), आरईसीपी IV पार्क हॉटेल इनव्हेस्टर्स लिमिटेड तर्फे २३०.०० दशलक्ष रुपयांपर्यंत आणि आरईसीपी IV पार्क हॉटेल को इनव्हेस्टर्स लिमिटेड तर्फे १०.०० दशलक्ष रुपयांपर्यंत (एकत्रित “गुंतवणूकदार विक्री भागधारक” म्हणून संदर्भित) इक्विटी समभागांचा समावेश आहे.
रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे सादर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) वर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.
जेएम फायनान्शीयल लिमिटेड, अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.