no images were found
‘इंग्लिश विंग्लिश’मधील बालकलाकार नाविका कोटिया करणार मालिकांमध्ये पदार्पण
गेल्या तीन दशकांमध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस पडतील अशा अनेक कथा सादर केल्यानंतर ‘झी टीव्ही’ वाहिनी आता ‘क्योंकि… सास माँ, बहू बेटी होती है’ ही आणखी एक नवी विचारप्रवर्तक मालिका प्रसारित करणार आहे. मालिका प्रेक्षकांना गुजरातमध्ये घेऊन जाईल. नवरात्रीच्या उत्सवादरम्यान पालनपूरमधील राजगौर कुटुंबात सून हेतल घटस्फोटाची मागणी करते, त्यामुळे नवे वादळ घोंघावू लागते. या मागणीमुळे ती सुनेच्या पारंपरिक नात्यालाच आव्हान देते. या घटनेमुळे राजगौर कुटुंबातील सर्वात मोठी सून आणि कुटुंबप्रमुख अंबिका ही मनातून कोसळते. सारे कुटुंब एकत्र राखण्याची जबाबदारी तिच्या डोक्यावर असते. धाकट्या जावेच्या ‘सास कभी माँ और बहू कभी बेटी नहीं बन सकती’ या ठाम भूमिकेमुळे राजगौर कुटुंबियांच्या मालकीच्या अनाथालयात दाराशी सोडण्यात आलेल्या केसर नावाच्या एका अनाथ मुलीला अंबिका दत्तक घेते. पण ती तिला एक मुलगी म्हणून नव्हे, तर सून म्हणून वाढवण्याचा निर्णय जाहीर करते.
या मालिकेत केसरची भूमिका नाविका कोटिया साकारणार आहे. केसर ही लाघवी मुलगी असते. ती महत्त्वाकांक्षी असते, पण आपल्या स्वप्नांना ती आपल्या कुटुंबियांच्या स्वप्नांशीच संलग्न करते. ‘या तो जीत लोगे या तो सीख लोगे’ अशी तिच्या मनाची धारणा असल्याने ती कधीच हार मानत नाही. अंबिकाच्या आयुष्यात तिचे येणे हे तिचे विधिलिखित होते आणि अंबिकाबद्दलची तिची आस्था हे तिच्या संपूर्ण समर्पणाचे द्योतक असते. अंबिका आपल्याला भावी सून म्हणून वाढवत आहे, याची तिला जाणीव असते आणि म्हणूनच आपले कुटुंब एकत्र राखण्याची जबाबदारी आपलीसुध्दा आहे, हे ती जाणून असते.
नाविका कोटिया म्हणाली, “मला नायिकेची भूमिका देणारी पहिलीच मालिका मिळाल्यामुळे मी मनातून थरारून गेले आहे. त्यातही ‘क्योंकि… सास माँ, बेटी बहू होती है’ यासारख्या पुरोगामी दृष्टिकोन बाळगणार््या मालिकेत मला ही भूमिका मिळाली याचा मला अधिक आनंद वाटतो. आपली करिअर आणि जीवन यांच्यात कसा समतोल साधायचा याची कल्पना यातील केसर या माझ्या व्यक्तिरेखेला आहे. मला तिची ‘हार कधी न मानण्याची’ वृत्ती खूप आवडली.
नायिकेच्या भूमिकेद्वारे मालिकांमध्ये पदार्पण करण्यास नाविका अधीर झाली असली, तरी तिची वाटचाल कशी राहील, हे पाहमे प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल.