Home क्राईम     वनविभागाने पकडले लाखो रुपयांचे सागवान, दोन ट्रक ताब्यात

    वनविभागाने पकडले लाखो रुपयांचे सागवान, दोन ट्रक ताब्यात

14 second read
0
0
136

no images were found

          वनविभागाने पकडले लाखो रुपयांचे सागवान, दोन ट्रक ताब्यात

भंडारा : सागवान वृक्षाची कटाई करून वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकवर वनविभागाने कारवाई करून ७ लाख रुपयांचे सागवान लाकूड जप्त केले. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी येथे घडली. वनविभागाच्या गस्ती पथकाने करून जप्त केलेले लाकूड गडेगाव डेपोत जमा करण्यात आले आहे.

    लाखनी वनविभागाच्या गस्ती पथकाला ट्रकमधून सागवान लाकडाची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर नाकाबंदी करून ट्रक (क्र. एमएच ४० एके-५३१७  व  एमएच-४०सीडी०४१३) यांना थांबवून तपासणी केली असता. ७लाख रुपयांची सागवान लाकडे भरलेली दिसली. वाहनचालकाजवळ परवाना नसल्याने दोन्ही ट्रक जप्त करून गडेगाव आगारात जमा करण्यात आले आहेत.७ लाख रुपयांचा सागवान लाकूड व दोन ट्रक असा २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रकच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू असून ट्रकच्या मालकाला अटक करण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

     अचानक वनविभागाच्या कारवाईमुळे तस्करी करणारे चांगलेचं हादरले आहेत. या प्रकरणातला खरा सुत्रधार कोण याचा पोलिस शोध घेत आहेत. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या झाडांची सुध्दा चाचणी करण्यात येणार आहे.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली!

अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने जोरदार फिल्डिंग लावली! मुंबई : गेल्या महिन्याभर…