
no images were found
एअरटेल बिझनेसने 20 दशलक्ष स्मार्ट मीटर्स पॉवर-अप करण्यासाठी इंटेलिस्मार्ट सोबत केली भागीदारी
गुरुग्राम : भारती एअरटेल (“एअरटेल ”), भारतातील आघाडीच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांपैकी एक, ने आज इंटेलिस्मार्ट इंफ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड सोबत महत्त्वपूर्ण भागीदारीची घोषणा केली. इंटेलिस्मार्ट ही एक आघाडीची स्मार्ट मीटरिंग आणि डिजिटल सोल्यूशन्स प्रदाता आहे आणि या भागीदारी अंतर्गत 20 दशलक्ष स्मार्ट मीटर्स पॉवर-अप होतील. ही भागीदारी एअरटेलच्या क्लाउड आणि एनालिटिक्ससह प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर आणि मीटर डेटा मॅनेजमेंट सिस्टीम यांसारख्या उच्च श्रेणीतील अनुप्रयोगांमध्ये एअरटेलचा प्रवेश देखील चिन्हांकित करते . देशातील स्मार्ट मीटरिंग क्षेत्रातील हा सर्वात मोठा करार आहे. हे विविध क्षेत्रांमध्ये एअरटेलच्या वेगाने वाढणाऱ्या आयओटी तैनातीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल.
एअरटेलच्या आयओटी ऑफरमध्ये त्याच्या मालकीचे प्लॅटफॉर्म ‘एअरटेल आयओटी हब’ समाविष्ट आहे. हे कंपनीला प्रगत एनालिटिक्ससह स्मार्ट मीटर्सचा मागोवा घेण्यास आणि निरीक्षण करण्यास मदत करेल. हे टेल्को ग्रेड सुरक्षेसह समृद्ध अत्यंत उच्च विश्वसनीयता देखील राखेल. आयओटी हब एअरटेलच्या स्वतःच्या क्लाउड नेटवर्कवर आहे. हे एंटरप्राइझ वापरकर्त्यांना सुरक्षित आणि कार्यक्षम पद्धतीने अब्जावधी उपकरणे आणि अनुप्रयोग कनेक्ट आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता देईल.
एअरटेल बिझनेस (इंडिया) चे सीईओ , गणेश लक्ष्मीनारायणन या उपक्रमावर भाष्य करताना म्हणाले, “आम्ही देशातील सर्वात मोठे आयओटी सक्षम कंपनी म्हणून बाजारपेठेतील आमचे स्थान आणखी मजबूत केले आहे. एअरटेल व्यवसायासाठी आयओटी हा सर्वात वेगाने वाढणाऱ्या व्यवसाय विभागांपैकी एक आहे. आणि या करारामुळे, 250 दशलक्ष पारंपारिक मीटर्सचे स्मार्ट मीटर्स म्हणून डिजिटायझेशन करण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी आम्ही धोरणात्मक स्थितीत आहोत. आमच्या प्लॅटफॉर्मवर देशभरात कनेक्ट केलेल्या उपकरणांसह, आम्ही आमचा सध्याचा आयओटी मार्केट शेअर 55.4% (आर्थिक वर्ष 23-24 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत) विलक्षण दराने वाढेल.”
इंटेलिजमार्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे एमडी आणि सीईओ अनिल रावल म्हणाले, “भारताचा स्मार्ट मीटरिंग प्रोग्राम हे वीज वितरण क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी सरकारने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. स्मार्ट मीटर्स हे स्मार्ट ग्रीडसाठी महत्त्वपूर्ण आहेत आणि पॉवर सिस्टम डिजिटलायझेशनच्या प्रयत्नांचा पाया आहेत. आम्ही भारतातील स्मार्ट मीटर्सच्या सर्वात मोठ्या पोर्टफोलिओपैकी एक लागू करण्याची तयारी करत असताना, आम्ही या क्षेत्रातील काही सर्वात सक्षम आणि पात्र भागीदारांवर अवलंबून आहोत. हे विविध उपाय प्रदान करेल आणि आमच्या प्रगत मीटरिंग इन्फ्रास्ट्रक्चर (एएमआय ) सोल्यूशन्सची यशस्वी तैनाती सक्षम करेल. आम्हाला खात्री आहे की, एअरटेलला धोरणात्मक भागीदार म्हणून जोडणे हे एक मजबूत युती बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरेल. अशा प्रकारे मजबूत आणि सुरक्षित क्लाउड-आधारित सेल्युलर कम्युनिकेशन नेटवर्कसह आमचे पायाभूत उपाय अधिक मजबूत केले जातील. ’’
भारत सरकारने येत्या पाच वर्षांत 250 दशलक्ष पारंपारिक मीटरच्या जागी स्मार्ट मीटर्स लावण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. हा एएमआय उपक्रमाचा एक भाग आहे. एअरटेल आयओटी चे उद्दिष्ट त्यांच्या अद्वितीय क्षमतेने सरकारचे हे लक्ष्य साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावण्याचे आहे. भारत सरकारच्या सहकार्याने वीज क्षेत्राचे डिजिटलायझेशन करून या क्षेत्रातील पारदर्शकता आणि ग्राहक-अनुकूल उपाय सुरू केले जातील. त्यामुळे स्मार्ट मीटर्स सारखे नवीन शोध सामान्य होतील.