Home संशोधन “डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम

“डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम

26 second read
0
0
14

no images were found

“डेटा” हे नवसंशोधन व प्रगतीचे इंधन – श्रीनिवास पी. एम

 

कसबा बावडा( प्रतिनिधी):-आजच्या काळात डेटा चे महत्व अतिशय वाढले आहे.  डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून अचूक विश्लेषणाच्या माध्यमातून जलद व अपारदर्शक निर्णय घेणे शक्य आहे. त्यामुळे अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्राध्यापकांनी प्रभावी वापर करावा असे आवाहन ‘फीस्ट आय.टी. सोल्युशन्स. बेंगलोर’चे तज्ञ  श्रीनिवास पी. एम. यांनी केले. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय,कोल्हापूर येथे “पॉवर बी.आय” वरील  तांत्रिक कौशल्यांसंबंधित राष्ट्रीय “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम’मध्ये ते बोलत होते.

      डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दिनांक २ जून ते ६ जून दरम्यान  “फॅकल्टी डेव्हलोपमेंट प्रोग्रॅम” चे संपन्न झाला. या कार्यशाळेसाठी विविध अभियांत्रिकी महाविद्यातील कॉम्पुटर सायन्स अँड इंजिनियरिंग, डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अशा विविध शाखांमधून सुमारे ७० हुन अधिक प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला.

या कार्यशाळेसाठी “फीस्ट आय.टी. सोल्युशन्स बेंगलोर” मधील श्री. शैलेश शेट्टी व श्री. श्रीनिवास पी. एम. या तज्ज्ञांनी  “पॉवर बी. आय.” विषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. 

         श्रीनिवास पी. एम. यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि “आजच्या काळात डेटा हे नवसंशोधनाचे व प्रगतीचे इंधन आहे. पॉवर बी.आय. तंत्रज्ञान वापरून सर्व प्रकारच्या बिझनेसेसच्या डेटाचे व्हीज्युअलायजेशन केले जाते. ज्याचा उपयोग कंपन्यांना त्यांचे पुढील बिझनेस प्लॅन्स व निर्णयप्रक्रिया अचूकरित्या करण्यासाठी उपयोग होतो.” 

      यावेळी डॉ. सुनील सी. के. यांनी अमेरिकेतून ऑनलाईन माध्यमातून एक संपूर्ण सत्राचे अध्यापन केले. ते म्हणाले कि संगणकाच्या डेटावरती आता सर्वच व्यवसायांचे अवलंबित्व वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात “डेटा व्हीज्युअलायजेशन” हे वाढतच जाणार आहे.

      या कार्यशाळेसाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष  आमदार  सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील व कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता याचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन अकॅडेमिक्स डॉ. भगतसिंग जितकर, संगणक विभागप्रमुख प्रा. राधिका ढणाल, समन्वयक डॉ. सागरगौडा पाटील व सर्व अध्यापक वर्ग यांचे सहकार्य लाभले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In संशोधन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले

गुजरात विमान दुर्घटनेतील मृतांप्रती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुःख व्यक्त केले   क…