
no images were found
संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात
आजी- माजी विद्यार्थी व पालक मेळावा
कोल्हापूर,(प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाचा आजी – माजी विद्यार्थी व पालक मेळावा आज मोठ्या उत्साहात झाला. संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या सभागृहामध्ये या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी प्रसिद्ध सतारवादक श्री. अरुण डोंगरे, प्रसिद्ध शाहीर व विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. आझाद नायकवडी, डॉ. आनंद धर्माधिकारी आदी प्रमुख अतिथी तसेच मोठ्या संख्येने आजी – माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. या मेळाव्याच्या निमित्ताने संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी भावगीत, गझल. समूहगीत, मूकनाट्य, लघुनाटिका, नकला, पारंपारिक लोकनृत्य, ठसकेबाज लावणी आदी विविधांगी कलागुणांचे अतिशय बहारदार सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले. सूत्रसंचालन कु. आसावरी लोहार हिने केले. श्री. संदेश गावंदे, श्री. विक्रम परीट यांनी तबलासाथ तर श्री. प्रथमेश पाटील यांनी संवादिनीसाथ केली. श्री. बबन माने, श्री. मल्हार जोशी, श्री. ओंकार सूर्यवंशी, श्री. अतुल परीट, श्री. विकास कांबळे, श्री. युवराज केळुस्कर, राज पाटील यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. या कार्यक्रमासाठी अधिविभागातील विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.