Home शैक्षणिक रशियन विद्यापीठांनी भारतातील एमबीबीएस प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी केली गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तींची घोषणा,

रशियन विद्यापीठांनी भारतातील एमबीबीएस प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी केली गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तींची घोषणा,

18 second read
0
0
17

no images were found

रशियन विद्यापीठांनी भारतातील एमबीबीएस प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांसाठी केली गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तींची घोषणा,

 

राष्ट्रीय अस्मिता, प्रगती आणि एकत्मिता यांचे दर्शन घडविणारा ‘रशिया दिन’ साजरा करण्यास रशियन जनता सज्ज झाली असताना रशियन सरकारच्या अनेक विद्यापीठांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ताआधारित शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. अत्यंत महत्वाच्या अशा या शैक्षणिक घोषणेमुळे भारतातून रशियामध्ये एमबीबीएस पदवी शिक्षण घेण्यास सज्ज असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी संधी प्राप्त होणार आहे.

         या उपक्रमातून रशिया दिनाच्या निमित्ताने त्या देशातील स्पिरीट समोर येते आणि त्याचवेळी रशिया आणि भारत यांच्यातील दीर्घकालीन परस्परसंबंधही अधोरेखित होतात. या घोषणेमुळे भारतीय विद्यार्थ्यांना किफायतशीर, जागतिक स्तरावर मान्यता पावलेले आणि उच्च दर्जाचे वैद्यकीय शिक्षण प्राप्त होणार आहे. २०२५ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून अर्ज स्वीकारले जात आहेत. विद्यार्थ्यांनी गुणवत्ताआधारित शिष्यवृत्तीसाठी आणि आपल्या आवडीच्या विद्यापीठात प्रवेश मिळविण्यासाठी त्वरा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा : इमेल – apply@edurussia.in  किंवा फोन व व्हॉटसअॅप – 9769761099

      “रशिया दिनाचे स्पिरीट किंवा चैतन्य हे केवळ त्या देशाची राष्ट्रीय कामगिरी अधोरेखित करण्यापुरते सीमित नाही. मात्र त्यात स्नेहपूर्ण संबंध आणि संधी यांचाही समावेश होतो. विद्यापीठांकडून दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती या पात्र विद्यार्थ्यांना त्या देवू करत असलेल्या संधी आणि जागतीक दर्जाचे शिक्षण यांच्याप्रती असलेली रशियाची बांधिलकी यांचे अधोरेखन आहे, असे उद्गार ‘एडयुरशिया’चे अधिकृत प्रतिनिधी श्री मनोज पत्की यांनी काढले. ‘एडयुरशिया’ ही रशियन विद्यापीठांसाठी भारतीय प्रवेशासाठीची अधिकृत संस्था आहे.या शिष्यवृत्ती विविध रशियन सरकारी विद्यापीठांकडून शैक्षणिक गुणवत्ता, प्रवेश परीक्षेतील गुण आणि कामगिरी निर्देशांक यांच्या माध्यमातून दिल्या जातात. प्रत्येक संस्थेत अगदी मर्यादित प्रवेश असल्याने विद्यापीठे शिक्षण शुल्क व तत्सम शुल्कांवर सूट देवू करत असून हे प्रमाण २० ते १०० टक्के एवढे मोठे आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांवर येणारा आर्थिक भार कमी होण्यास मदत होईल.आज भारतीय कुटुंबे विश्वासार्ह,एनएमसीयुक्त आंतरराष्ट्रीय संधींच्या शोधात असताना ही घोषणा झाली आहे. आज आशियातील अनेक देशांमधील परिचय धोरणांमुळे वैद्यकीय पदाव्यांवर अतिशय विपरीत परिणाम होत असताना ही घोषणा होत आहे, हेसुद्धा विशेष आहे.

       भारतीय विद्यार्थ्यांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील प्रवेशासाठी रशियाला पसंती दिली जाते. गेल्या तीन दशकांमध्ये रशियाने एमबीबीएस, अभियांत्रिकी, व्यवसाय आणि संशोधन अभ्यासक्रम या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी तब्बल ७० देशांमधील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे. रशियातील विद्यापीठांमध्ये घेतलेल्या पदव्यांना युरोप, आशिया आणि अगदी त्यापलीकडील खंडामध्येही मान्यता आहे. या पदव्यांचा समावेश युरोपीयन परिशिष्टामध्ये झाल्याने रशियातून पदवी घेतलेले विद्यार्थी जगात कुठेही नोकऱ्या मिळवू शकतात.भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर मान्यता पावलेले अभ्यासक्रम, अनुभवी शिक्षक, सर्वसमावेशक वैद्यकीय मान्यता, वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वातावरण यांचा फायदा होतो. त्याचबरोबर येथील कॅम्पस हे सर्वसमावेशक, सुरक्षित आणि शाश्वत अभ्यास वातावरण उपलब्ध करून देतात. दोन देशांमधील शैक्षणिक बंध हे १९९१ पासूनचे आहेत. त्यावेळी नॉर्थ ओसेशन स्टेट मेडिकल अॅकॅडेमीने सर्वप्रथम भारतीय विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायला सुरुवात केली. तेव्हापासून रशियातील विद्यापीठांमधून अक्षरशः हजारो विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. डॉक्टर, प्राध्यापक आणि आरोग्यनिगा व्यावाव्सायिक अशा विविध क्षेत्रात त्यांनी जागतिक मान्यता मिळवली आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम कोल्ह…