Home उद्योग स्कोडा ऑटो भारताच्या विकासासाठी सज्ज: २५ वर्षांच्या यशानंतर नवीन योजना सादर

स्कोडा ऑटो भारताच्या विकासासाठी सज्ज: २५ वर्षांच्या यशानंतर नवीन योजना सादर

2 min read
0
0
16

no images were found

स्कोडा ऑटो भारताच्या विकासासाठी सज्ज: २५ वर्षांच्या यशानंतर नवीन योजना सादर

 

कोल्हापूर,  : वर्ष २०२५ जगभरातील स्‍कोडा ऑटोसाठी महत्त्वपूर्ण आहे, जेथे यंदा संपन्‍न वारसाची १३० वर्षे आणि भारतात २५ उत्‍साहवर्धक वर्षे साजरी केली जात आहे. ग्राहकांच्‍या जवळ पोहोचण्‍याच्‍या धोरणाला अधिक दृढ करत स्‍कोडा ऑटो इंडियाने भारतातील बाजारपेठेमधील गतीला चालना देण्‍यासाठी प्रमुख ब्रँड, उत्‍पादन, नेटवर्क आणि ग्राहक-केंद्रित उपक्रमांची रूपरेषा आखली आहे.  

        याप्रसंगी मत व्‍यक्‍त करत स्‍कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड संचालक आशिष गुप्‍ता म्‍हणाले, ”भारत युरोपबाहेर स्‍कोडा ऑटोसाठी सर्वात महत्त्वाची विकास बाजारपेठ आहे. आम्‍ही उद्देशपूर्ण क्षमता, सुस्‍पष्‍ट दृष्टिकोन आणि गतीशील अंमलबजावणीसह मजबूत, भविष्‍यासाठी सुसज्‍ज ब्रँड निर्माण करण्‍यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमचे प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍ह धोरण ग्राहकांच्‍या सर्वसमावेशक गरजा आणि महत्त्वाकांक्षांशी सुसंगत आहे, जे आमच्‍या प्रगतीप्रती प्रवासाला गती देत आहे. आम्‍ही ग्राहकांच्‍या जवळ पोहोचत आहोत, धोरणात्‍मकरित्‍या आमचे नेटवर्क विस्‍तारित करत आहोत आणि दर्जा, सुरक्षितता व मूल्‍याप्रती आमचा वारसा अधिक दृढ करत आहोत. आमच्‍या सर्व व्‍यवसाय कार्यांमध्‍ये विकासाला गती देण्‍यासह २०२५ उत्तम वर्ष ठरेल, जेथे आम्‍ही मोठ्या प्रमाणात ब्रँडला प्रबळ करू आणि भारतात प्रगतीच्‍या दिशेने वाटचाल करत राहू.”  

      स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या प्रॉडक्‍ट ऑफेन्सिव्‍ह धोरणामध्‍ये ‘एसयूव्‍ही फॉर एव्‍हरीवन’चा समावेश आहे, जे त्‍यांचा सेदान वारसा अधिक दृढ करत आहे. कायलॅक, कुशक व कोडियक प्रत्‍येक एसयूव्‍ही अस्‍पायरेशन आणि किमतीची पूर्तता करत असताना स्‍कोडा ऑटो इंडिया स्‍लाव्हिया आणि लवकरच लाँच करण्‍यात येणाऱ्या ‘ग्‍लोबल आयकॉन’द्वारे संचालित त्‍यांचा सेदान वारसा अधिक दृढ देखील करेल.

      स्‍कोडा ऑटो इंडियाने द्वितीय व तृतीय श्रेणीच्‍या बाजारपेठांमध्‍ये विस्‍तार करण्‍याचा आपला दृष्टिकोन कायम ठेवला आहे. आज १६५ हून अधिक शहरांमध्‍ये उपस्थिती असण्यासह ब्रँडचे या वर्षामध्‍ये २०० हून अधिक शहरांमध्‍ये उपस्थिती निर्माण करण्‍याचे लक्ष्‍य आहे. कंपनीने २०२१ मध्‍ये १२० ग्राहक टचपॉइण्‍ट्सची संख्‍या आज २९० हून अधिक ग्राहक टचपॉइण्‍ट्सपर्यंत वाढवली आहे, जेथे २०२५ च्‍या अखेरपर्यंत ही आकडेवारी ३५० टचपॉइण्‍ट्सपर्यंत घेऊन जाण्‍याचा मनसुबा आहे.  

     स्‍कोडा ऑटो इंडियाचा त्‍यांच्‍या प्रमाणित पूर्व-मालकीचा व्‍यवसाय सारख्‍या पूरक व्‍यवसायांना अधिक मजबूत करण्याचा स्‍पष्‍ट संकल्‍प आहे, ज्‍यामुळे त्‍यांच्‍या विकासाला अधिक गती मिळेल. सरकारी संस्‍था,  आणि इतर ताफ्यांच्‍या गरजांची आधीच पूर्तता करत असले तरी ब्रँड या मार्गांमधून विकासाला अधिक गती देण्‍यासाठी नवीन क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करेल,

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In उद्योग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने 16 जून ते दि.31 जुलै अखेर अतिसार नियंत्रण मोहिम कोल्ह…