कर्करोग उपचारांसाठी चुंबकीय नॅनो कणांच्या निर्मितीसाठी पेटंट -डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांचे यश कोल्हापूर (प्रतिनिधी):-कर्करोगावरील ‘हायपरथर्मिया’ उपचारासाठी आवश्यक असलेल्या अॅमिनेटेड चुंबकीय नॅनो कणांची निर्मिती करणाऱ्या संशोधनासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या संशोधकांना पेटंट मिळाले आहे. विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसीप्लीनरी स्टडीजमधील प्राध्यापक डॉ. विश्वजीत खोत, संशोधक विद्यार्थी डॉ. सतिश फाळके आणि राजाराम कॉलेजच्या डॉ. अश्विनी साळुंखे यांनी हे संशोधन …