
no images were found
एका खास स्नेहभेटीसोबत सपना सिकरवार यांचा वाढदिवस साजरा
अँड टीव्ही च्या ‘हप्पू की उलटन पलटन’मधील बिमलेश या भूमिकेसाठी ओळखल्या जाणाऱ्या सपना सिकरवार यांनी आपल्या प्रियजनांसोबत अत्यंत आनंद व उत्साहात वाढदिवस साजरा केला. या कार्यक्रमात त्यांचे कुटुंबिय, जवळचे मित्रमैत्रिणी, माजी सहकारी आणि विद्यमान सहकलाकार सहभागी झाले. त्यांनी या निमित्ताने अविस्मरणीय स्नेहभेटीचे आयोजन केले. आपल्या खास दिनानिमित्त बोलताना सपना सिकरवार ऊर्फ बिमलेश म्हणाल्या की, “हा वाढदिवस खऱ्या अर्थाने माझ्यासाठी जादुई होता. मी माझ्या कुटुंबासोबत भोजनाचा आस्वाद घेत हा दिवस साजरा करायचे ठरवले होते. परंतु अत्यंत गुप्तपणे एक धमाल सेलिब्रेशन ठरवले जात असल्याची मला कल्पनाही नव्हती. मी कार्यक्रमाच्या ठिकाणी गेले आणि थक्क झाले. माझे पती, मुली मान्या आणि हप्पू की उलटन पलटनची संपूर्ण टीम तिथे आलेली होती. त्यासोबत इंडस्ट्रीमधले माझे सर्वांत जुने आणि लाडके मित्र जसे किकू शारदा, कविता कौशिक, गोपी बल्ला आणि आधीच्या शोमधले इतर अनेक जण आले होते. हे रियुनियन खूप छान होते. आम्ही खूप हसलो, कडकडून भेटलो आणि जल्लोष केला.” त्या पुढे म्हणाल्या की, “ही रात्र माझ्यासाठी अविस्मरणीय होती. आम्ही नाचलो, गाणी म्हटली आणि अर्थातच फोटो व व्हिडिओ काढले. माझी मुलगी मान्या ही या पार्टीचा जीव होती. ती खूप उत्साहात सगळीकडे धावत होती. ती आणि माझा नवरा सोबत असताना त्यांच्यासोबत केक कापणे ही खूप धमाल गोष्ट होती. मला फारच मजा आली.”
सपना पुढे म्हणाल्या की, “असे वाढदिवस तुम्हाला हे आठवण करून देतात की, अनेक वर्षे गेल्यावर आणि कितीही अंतर पडले तरी प्रेम आणि मैत्री कायम राहते. माझ्या खोलीतला उत्साह, माझे मित्र आणि सहकलाकारांची ऊर्जा, चविष्ट खाद्यपदार्थ आणि सगळीकडे असलेली धमाल यांच्यामुळे मला खूप स्पेशल वाटले. हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय बनवण्यासाठी मी सर्वांचीच खूप आभारी आहे. यंदाच्या वर्षी माझ्यासाठी महत्त्वाचे लोक माझ्यासोबत असावेत ही एकमेव इच्छा होती. ती अत्यंत सुंदर पद्धतीने सत्यात उतरली आहे.”