
no images were found
सिंबा गॅरेज लॉस पाब्लोस गोव्यात दाखल
गोवा, तयार आहात ना? सिंबा गॅरेज लॉस पाब्लोस मेक्सिकन लेगर अखेर गोव्यात दाखल झालेली आहे. ठसठशीत चवीने परिपूर्ण, कुरकुरीत आणि खास शैलीने निर्माण केलेली ही मर्यादित स्वरूपात उपलब्ध असलेली लेगर (फक्त 1 ,500 बॉटल) आपल्या ट्रॉपिकल फ्लेवर्स, मऊ टेक्शर आणि ताजीतवानी करणाऱ्या चवीने बिअरच्या जगात नवा रंग भरणार आहे. पण ही केवळ एक साधी लेगर नाही तर हे उत्कृष्ट क्राफ्ट ब्रूइंगचे म्हणजे विशिष्ट प्रकारे बिअर बनविण्याच्या तंत्रज्ञानाचे परिपूर्ण उदाहरण आहे.लॉस पाब्लोस ही बहुप्रतिष्ठित अशा सिंबा ब्रू ऑफ स्पर्धेमध्ये विजयी ठरलेली बिअर आहे. भारतातील सर्वोत्तम मायक्रोब्रुअरींनी या स्पर्धेत भाग घेतला होता. मुंबईतील वुडसाइड इन येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत अनेक कुशल ब्रुअर्स अर्थात बिअर बनविणारे तज्ञ यांनी त्यांच्या दोन सर्वोत्तम बिअर्स सादर केल्या. चव, सुगंध, स्वरूप आणि ब्रूइंगच्या गुणवत्तेनुसार परीक्षण केल्यानंतर, मुंबईतील रोलिंग मिल्स ब्रुअरीची लॉस पाब्लोस ही बिअर विजयी ठरली. या विजयामुळे त्यांना सिंबा कंपनीसोबत मिळून स्मॉल-बॅच बिअर तयार करण्याची संधी मिळाली. गेल्या वर्षी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याची यशस्विता म्हणून लॉस पाब्लोस जन्माला आली, जी गोव्याच्या निवांत आणि आनंदी वातावरणाला अगदी साजेशी आहे.
लॉस पाब्लोस ही सिंबा गॅरेजचा पहिला खास प्रयोग आहे. सहकार्यातून क्राफ्ट बिअर बनविणारा हा उपक्रम फ्लेवर्स आणि नावीन्याच्या पलीकडे जाऊन संपूर्ण भारतातील स्वतंत्र ब्रुअरींना प्रकाशझोतात आणण्याचे काम करतो. सिंबा गॅरेज ही नाविन्यपूर्ण प्रयोगांचे व्यासपीठ आहे, जिथे लहान प्रमाणात तयार होणाऱ्या विशेष बिअर तयार केल्या जातात. येथे भारतातील नाविन्यपूर्ण आणि उत्तम क्राफ्ट बिअर निर्माते एकत्र येऊन वेगळ्या आणि खास बिअर तयार करतात.
पहिल्या आवृत्तीसाठी, सिंबाने विजयी झालेल्या मुंबईच्या रोलिंग मिल्स ब्रुअरी सोबत भागीदारी केली आहे. ही क्राफ्ट ब्रुअरी आपल्या बारकाईने केलेल्या कामगिरीसाठी आणि ठसठशीत चवींसाठी ओळखली जाते. दोघांनी मिळून लॉस पाब्लोस तयार केली आहे जी एक हलकी, कुरकुरीत आणि सहज प्यायली जाणारी मेक्सिकन शैलीची लेगर बिअर आहे. ती सिंबाच्या गडद आणि भरगच्च चवीच्या बिअरला एक ताजेतवाना पर्याय देते. त्यामध्ये उष्णकटिबंधीय फळांची ताजे स्वाद आणि कॉर्न टॉर्टियाचा हलकासा स्वाद आहे, त्यामुळे ती नेहमीच्या माल्टी आणि हॉप-फॉरवर्ड बिअरपेक्षा वेगळी आहे. ही भागीदारी सिंबाची प्रादेशिक चवींचा सन्मान करण्याची आणि लहान प्रमाणात तयार होणाऱ्या उत्कृष्ट बिअरला प्रोत्साहन देण्याची बांधिलकी दर्शवतो, तसेच गुणवत्ता आणि नाविन्य जपण्याच्या सिंबाच्या ध्येयाशी सुसंगत आहे.
लॉस पाब्लोस ही गोव्याच्या उन्हात न्हालेल्या समुद्रकिनाऱ्यांसाठी आणि जल्लोषमय रात्रींसाठी आदर्श आहे. त्याच्या लुचा लिब्रे अर्थात मेक्सिकन कुस्तीने प्रेरित डिझाईनयुक्त बॉटलमुळे तिला एक हटके लूक आणि वेगळे अस्तित्व मिळाले आहे. ही फक्त सुरुवात आहे. सिंबा गॅरेज आता येथे दाखल झालेले आहे आणि क्राफ्ट बिअरच्या दुनियेत नवा बदल घडवायला सज्ज आहे. मात्र, ही फक्त मर्यादित काळासाठी उपलब्ध आहे. केवळ 1,500 बॉटल उपलब्ध असल्याने ही बिअर लवकर संपणार आहे हे नक्की.