
no images were found
पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत
मुंबई,: -प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया या कंपनीचा प्रमुख कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व कार्यक्रम असलेल्या पीअँडजी शिक्षाने यंदा एक महत्त्वाचा टप्पा गाठला असून, शिक्षणाच्या माध्यमातून आयुष्य बदलविणाऱ्या त्यांच्या 20 वर्षीय योगदानाचा उत्सव साजरा करत आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, या कार्यक्रमाने देशातील दुर्लक्षित समुदायांमध्ये शिक्षण उपलब्ध करून देऊन आणि शिकण्याच्या संधी सुधारून 50 लाखांहून अधिक मुलांचे जीवन सकारात्मक पद्धतीने बदलले आहे. या प्रवासाचा सन्मान करण्यासाठी, पीअँडजी ने “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” नावाचं खास कॉफी टेबल बुक सादर केलं आहे, ज्यामध्ये बदल आणि शक्यतांच्या प्रेरणादायी कहाण्या समाविष्ट आहेत. शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला विकासाची संधी दिल्यास काय बदल घडू शकतो, याचं हे शक्तिशाली उदाहरण आहे.
प्रत्यक्ष जमिनी पातळीवर मजबूत कार्यक्रमांसोबतच, पीअँडजी शिक्षा या उपक्रमाने लर्निंग गॅप्स (शिक्षणातील अंतर) विषयी जनजागृती करण्यावरही भर दिला आहे. यावर्षीची मोहीम #इरेज़ द लर्निंग गॅप ही मुलांवर होणाऱ्या नकारात्मक टिप्पणी अर्थात निगेटिव्ह लेबलिंगमुळे होणाऱ्या दुष्परिणामांवर अधिक सखोल लक्ष केंद्रित करते. जेव्हा एखादं मूल वर्गात मागे पडतं, तेव्हा त्यांना “कमकुवत”, “बुद्धू”, “स्लो”, किंवा “कच्चा लिंबू” अशा अन्यायकारक नावांनी हाक मारली जाते. अशा शब्दांमुळे आत्मविश्वास खचतो आणि ही शिक्षणातील अंतर अजून वाढते.
या उपक्रमाबद्दल बोलताना, अभिषेक देसाई (उपाध्यक्ष – ब्रँड ऑपरेशन्स आणि श्रेणी प्रमुख – ग्रूमिंग, पीअँडजी इंडिया) म्हणाले “पीअँडजी शिक्षाच्या 20 वर्षांचा प्रवास आम्ही अभिमानाने साजरा करतो आहे. हा प्रवास प्रत्येक मुलाला मर्यादा नव्हे तर संधी देणाऱ्या शिक्षणासाठी समर्पित आहे. या दोन दशकांत, पीअँडजी शिक्षाने केवळ शैक्षणिक प्रवेश नव्हे तर समजून घेऊन शिकणे या परिणामांवर लक्ष केंद्रित केले आहे. ‘ऍन्युअल स्टेटस ऑफ एज्युकेशन रिपोर्ट्स 2024 च्या अहवालानुसार, 5व्या इयत्तेतील निम्म्याहून अधिक मुले 2या इयत्तेच्या पातळीचं वाचनही करू शकत नाहीत. म्हणूनच आम्ही दुर्लक्षित समुदायांमध्ये लक्ष्यपूर्ण हस्तक्षेप करून मुलांना केवळ शाळेत प्रवेश नव्हे तर समजून शिकण्यावर भर दिला आहे. आमच्या कार्याचा परिणाम केवळ मोठ्या प्रमाणावर झाला आहे असं नाही, तर तो व्यक्तीगत स्तरावरदेखील खोलवर रुजला आहे. म्हणूनच, आम्ही ‘ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ’ सादर केले आहे ज्यात– पीअँडजी शिक्षाने बदल घडवलेल्या 20 प्रेरणादायी व्यक्तींच्या कहाण्या असून गेल्या 20 वर्षांतील सकारात्मक प्रभावाचं हे जिवंत उदाहरण आहे.”