Home Video पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान योजना लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संपन्न.             

पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान योजना लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संपन्न.             

52 second read
0
0
21

no images were found

पंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान योजना लोकार्पण सोहळा आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते होणार संपन्न.             

                              कोल्हापूर (प्रतिनिधी):-तब्बल तीन पिढ्या सर्वसामान्य जनतेला परवडणाऱ्या दरामध्ये विविध वैद्यकीय सेवा उपलब्ध पुरवणाऱ्या शिवाजी उद्योग नगर येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये आत्ता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना वालावलकर ट्रस्ट हॉस्पिटलला नुकतीच मंजुरी झाली आहे. याचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकरसो यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी दुपारी साडेबारा वाजता संपन्न होत आहे.                                                 कै. शा .कृ.पंत वालावलकर यांनी 1987 साळी कोल्हापुरातील पहिले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत सुरू केले .आधुनिक वैद्यकीय सुविधा अल्प दरात उपलब्ध केल्याने या हॉस्पिटलला मोठा लौकिक निर्माण झाला आहे.छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या बरोबरीने त्या काळात विश्वासहार्यता प्राप्त केली आहे .धाकटा दवाखाना म्हणून सदर हॉस्पिटल पंचक्रोशीत प्रचलित आहे. त्याला आता सदर शासकीय योजना मुळे अधिक व्यापकता लागणार आहे .यावेळी माहिती देताना संतोष कुलकर्णी यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत  प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या रूपाने सर्व प्रकारच्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ आतापर्यंत वालावलकर हॉस्पिटलमध्ये घेता येणार आहे. सदर योजनेमध्ये अस्थिरोग वरील ड्रामा जनरल सर्जरी कान , नाक घसा व मूत्ररोग यांचा समावेश आहे. लवकरच इतर आजारांच्या उपचाराच्या सोयीचा समावेश होणार आहे. त्याचबरोबर आता या ठिकाणी नेत्र दंतचिकित्सा ,डिजिटल एक्स-रे ,सोनोग्राफी, लहान मुलांच्या शस्त्रक्रिया व सुसज्ज्ञ अतिदक्षता विभाग कार्यरत आहे .वैद्यकीय उपचार सेवा समर्पित भावनेने कार्य करणारी कुशल डॉक्टरांची आणि सहकाऱ्यांची टीम कार्यरत आहे .                                        राज्य कामगार विमा आरोग्य योजनेशी सुद्धा संलग्न असून त्याचा लाभ विविध उद्योग संस्थातील कामगार व  त्यांचे कुटुंबीय लाभ घेत आहे .राज्य शासनाच्या कामगार कल्याण विभागाच्या मार्फत विविध सेवा सुविधाही उपलब्ध असून त्याच मोठा प्रतिसाद लाभत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. आगामी काळात लवकरच त्याचबरोबर येथे बांधकाम कामगारांच्या महामंडळामार्फत विविध वैद्यकीय योजना सुरू होणार असून त्याच्या मंजुरीची प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी होत असलेल्या या लोकार्पण सोहळ्यास आजवर उपचार घेतलेले रुग्ण व त्यांचे नातेवाईक हीतचिंतक यांनी या लोकार्पण सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने महालक्ष्मी हेल्थ फौंडेशनचे अध्यक्ष श्री संतोष कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Video

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सज्ज व्हावे : राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन   पुण…