no images were found
भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू प्रकरणी चौकशी सुरु
नवी दिल्ली : एका भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये डिसेंबर महिन्यात लहानमुलांचा मृत्यू झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर प्रदेशातील नोयडा स्थित मॅरीयन बायोटेक कंपनीच्या कफ सिरफवर बंदी घातली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी जारी केलेल्या अलर्टमध्ये, मॅरीयन बायोटेकने बनविलेले वैद्यकीय उत्पादने गुणवत्ता मानकांची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरली आहेत आणि म्हणून वापरली जाऊ नयेत असे म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अलर्टनूसार अंबरोनॉल सिरफ आणि DOK-१ मॅक्स सिरप यांच्यात दोष आढळला आहे. ही सिरफ उत्तर प्रदेशातील मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड तयार केले असून त्यांनी निकष पाळलेले नसल्याचे उघड झाले आहे. हे खोकल्यावरील सिरफ घेतल्याने उजबेकिस्तानमध्ये काही मुलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असल्याने ही फार्मा कंपनी अडचणीत आली आहे.
उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळांमध्ये या खोकल्याच्या सिरपच्या नमुन्यांच्या विश्लेषण केले, तेव्हा त्या दोन्ही उत्पादनांमध्ये डायथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोलचे प्रमाण जास्त आढळल्याचे म्हटले जात आहे. भारतीय कंपनीच्या कफसिरफने उजबेकिस्तानमध्ये लहानमुलांचा मृत्यू झाल्या प्रकरणी यूपी ड्रग कंट्रोलर आणि सेंट्रल ड्रग स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन तपास सुरू केला आहे. सिरपचे नमुने चंदीगढला पाठवण्यात आले असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले आहे.