
no images were found
राज्य सरकारी ७५ हजार पदांची मेगाभरती १५ ऑगस्टपूर्वी
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारने जाहीर केलेल्या ७५ हजार पदांच्या भरतीसाठी प्रशासनाने तयारीचा वेग वाढविला आहे. ही मेगाभरती येत्या १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा विचार असून या नोकरभरतीसाठी ज्या संस्थांची निवड करण्यात आली आहे, त्यांची परीक्षा घेण्याची क्षमता वाढविण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील पॉलिटेक्निक कॉलेज अथवा इतर संस्थांची मदत घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
राज्यात विविध विभागांमार्फत ७५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीप्रक्रियेत सुसूत्रता आणि पारदर्शकता येण्यासाठी राज्य सरकारने टीसीएस आणि आयबीपीएस या संस्थांची निवड केली होती. मात्र मुंबई आणि महत्त्वाचे जिल्हे वगळता ग्रामीण भागांत या संस्थेची केंद्रे नसल्याने भरती प्रक्रियेत अडथळे येण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. ७५ हजार पदांच्या भरती प्रक्रियेत साधारण १५ लाख अर्ज अपेक्षित असून, परीक्षा घेणाऱ्या संस्थेच्या तोकड्या क्षमतेकडे बोट दाखवले जात आहे. याची दखल राज्य सरकारने घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दरम्यान, या मेगाभरतीत पोलिस भरतीही होणार असून, ही भरती वगळता इतर विभागांतील भरती प्रक्रियेस विलंब होणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. पोलिस भरतीत शारीरिक चाचणीचा समावेश असल्याने त्याला वेळ लागणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली. उर्वारित अ आणि ब गटाची भरती तीन ते चार महिन्यांत पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा मानस असून.